सापाच्या नावाने जवळ-जवळ सगळेच घाबरतात. फक्त प्राणी प्रेमीच त्यांच्या जवळ जाण्याची हिंमत करु शकतात. कारण सापाचा एक दंश कोणालाही जीवेमारण्यासाठी पुरेसा असतो. पण असं असलं तरी देखील भारतात सापाला देवता मानलं जातं आणि त्याची पूजा देखील केली जाते.
भारतात सुमारे २७५ प्रकारचे साप आढळतात. पण आज आम्ही तुम्हाला भारतात आढळणाऱ्या सर्वात विषारी सापांबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्यापासून तुम्हाला लांब रहाणे गरजेचे आहे. नाहीतर तुमच्यासाठी खूपच धोकादायक ठरु शकतं.
कॉमनक्रेट (Common krait) हा असा साप आहे, जो तसा आक्रमक नाही. परंतू त्याला जर चिथावणी दिली तर तो चावू शकतो. याच्या विषामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि माणूस बेशुद्ध होतो. असात जर व्यक्तीला योग्य वेळी उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यू होतो.
स्पेक्टेकल्ड कोबरा (Spectacled Cobra or Indian cobra) हा साप दक्षिण भारतात आढळतो. याला इंडियन कोब्रा देखील म्हणतात. लोकांमध्ये स्पेक्टेकल्ड कोब्राची प्रचंड भीती आहे. बरेच लोक या सापाची पूजा देखील करतात. हा साप एखाद्याला चावल्यास न्यूरोटॉक्सिक विष लवकर पसरते, ज्यामुळे लकवा मारतो. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास मृत्यू होऊ शकतो.
किंग कोब्रा (King cobra) हा असा साप आहे, जो पाच मीटरपर्यंत लांब असू शकतो. हा साप एकाच दंशात भरपूर विष सोडतो. याला जगातील सर्वात विषारी साप देखील म्हटले जाते. किंग कोब्रा अशा जंगलात आढळतो, जिथे दूरवर लोक नसतात. किंग कोब्रा इतर सापांना आपला शिकार बनवतो.
रसेल वाइपर (Russell's Viper) हा अतिशय धोकादायक आणि विषारी साप आहे. हा साप बहुतांशी तामिळनाडूमध्ये आढळतो. रसेल व्हायपर शेतात घिरट्या घालताना दिसतो. हे साप अतिशय हुशारीने आपल्या शिकारावर हल्ला करतात. जर हा साप एखाद्याला चावला तर खूप त्रास होतो, कारण रसेल व्हायपर सापामध्ये एक विशेष प्रकारचे विष असते, जे रक्त गोठण्यासाठी आवश्यक घटक नष्ट करते.