Home /News /viral /

Video : पाण्यात पडलेल्या साथीदाराला वाचवण्यासाठी श्वानाची धडपड; पाहा शेवटी काय घडलं

Video : पाण्यात पडलेल्या साथीदाराला वाचवण्यासाठी श्वानाची धडपड; पाहा शेवटी काय घडलं

व्हिडिओमध्ये दिसतं, की घरातील पाळीव श्वान स्विमिंग पुलाच्या शेजारून जात असतो. हा श्वान अचानक स्लिप होऊन स्विमिंग पुलमध्ये कोसळतो.

  नवी दिल्ली 28 जानेवारी : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यात एक क्यूट श्वान स्विमिंग पुलमध्ये कोसळल्याचं दिसतं (Pet Dog Fell in Swimming Pool). यादरम्यान घरात कोणीच नसल्याने दुसरा एक श्वान या त्याच्या मदतीसाठी पुढे आल्याचं पाहायला मिळतं. व्हिडिओच्या शेवटी दुसरा श्वान स्विमिंग पुलमध्ये पडलेल्या श्वानाला बाहेर काढताना दिसतो. हा व्हिडिओ पाहून सगळेच या श्वानाचं कौतुक करत आहेत. पायातील मोज्यांनी केली पोलखोल; पाहताच महिलेला समजले पतीचे विवाहबाह्य संबंध सोशल मीडियावर अनेक व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की मालकाला बुडण्यापासून वाचवण्यासाठी श्वान पाण्यात उडी घेतो. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत राहतात. सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं, की घरातील पाळीव श्वान स्विमिंग पुलाच्या शेजारून जात असतो. हा श्वान अचानक स्लिप होऊन स्विमिंग पुलमध्ये कोसळतो.
  स्विमिंग पुलमध्ये कोसळल्यानंतर हा श्वान स्वतःला वाचवण्यासाठी बराच वेळ प्रयत्न करतो. या श्वानाला पोहता येत असलं तरीही घरी त्याला वाचवण्यासाठी कोणीच नसल्याने त्याच्या जीवाला धोका निर्माण होतो. अशात या श्वानाचा आवाज ऐकून घरात असलेला दुसरा डॉगी त्याच्या मदतीसाठी धावून येतो.

  मगरीला भरवताना घसरून तरुणाचाच पाय तिच्या जबड्याजवळ गेला आणि...; Shocking Video

  हा श्वान स्विमिंग पुलमध्ये बुडण्यापासून स्वतःला वाचवण्याकरता 34 मिनट संघर्ष करत राहातो. यादरम्यान पोहत तो स्विमिंग पुलाच्या एका काठावरुन दुसऱ्या काठावर जातो. अखेर पाण्यातून बुडण्यापासून वाचण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या श्वानाला वाचवण्यासाठी त्याचा साथीदार तिथे येतो. हा श्वान त्याला आपल्या तोंडात पकडून स्विमिंग पुलमध्ये बाहेर काढतो आणि त्याचा जीव वाचवतो. घरात लावलेल्या सिक्योरिटी कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली होती. नंतर मालकाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Dog, Viral video on social media

  पुढील बातम्या