जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पायातील मोज्यांनी केली पोलखोल; पाहताच महिलेला समजले पतीचे विवाहबाह्य संबंध

पायातील मोज्यांनी केली पोलखोल; पाहताच महिलेला समजले पतीचे विवाहबाह्य संबंध

पायातील मोज्यांनी केली पोलखोल; पाहताच महिलेला समजले पतीचे विवाहबाह्य संबंध

पतीने सूटकेस खाली करण्यासाठी सांगताच आनंदाने ती सूटकेस अनपॅक करू लागली. वापरलेले कपडे काढून ती वेगळे ठेवत होती. इतक्यात तिचं लक्ष पतीच्या मोज्यावर गेलं

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 28 जानेवारी : पतीची ऑफिस ट्रिपवरुन (Office Trip) येण्याची ती खूप आतुरतेने वाट पाहात होती. जेव्हा ती घरी परतला तेव्हा त्याला पाहून ती अतिशय आनंदी झाली. दोघंही दोन वर्षापासून सोबत होते. ते एकमेकांसोबत प्रत्येक दुःख शेअर करत असत. रिकाम्या वेळेत ते तासंतास एकमेकांसोबत गप्पा मारत आणि एकमेकांच्या जबाबदाऱ्याही सांभाळत असे. अशात अनेक दिवसांच्या ट्रिपवरुन पती घरी परतताच ती अतिशय आनंगी झाली. इतक्यात पतीने तिला नाश्ता मागत आपली सूटकेस रिकामी करण्यासाठी सांगितलं आणि इथेच सगळं गडबड झालं. दाल में कुछ काला है! ऑनलाईन मागवलेल्या डाळीच्या तडक्याने महिलेला 440 वोल्ट झटका हे नातं वेगळ्याच वळणावर गेलं. याचं कारण सूटकेस रिकामी करायला सांगणं नव्हतं. तर सूटकेसमध्ये लपलेलं असं गुपित होतं, जे उघड झालं (Woman Found Artificial Nail Stuck in Husband’s Socks). आपला पती या नात्यात अतिशय ईमानदार असल्याचा या महिलेचा समज होता, मात्र तिचं मन तुटलं. तिच्या हाती एक असा पुरावा लागला ज्यामुळे तिने सोशल प्लॅटफॉर्म टिकटॉकवरच आपल्या पतीची पोलखोल केली.

News18

पतीने सूटकेस खाली करण्यासाठी सांगताच आनंदाने ती सूटकेस अनपॅक करू लागली. वापरलेले कपडे काढून ती वेगळे ठेवत होती. इतक्यात तिचं लक्ष पतीच्या मोज्यावर गेलं. मोज्यावर पतीनं धोका दिल्याचा पुरावा होता (Extramarital Affair of Husband) जे पाहून महिलेला धक्काच बसला. तिला मोज्यामध्ये एक आर्टिफिशियल नख दिसून आलं. हे महिलेचं नख नव्हतं. तिचा असा दावा आहे, की ख्रिसमसपासूनच तिने आपल्या नखांमध्ये काहीही बदल केलेला नाही. नेल आर्टही जुनंच आहे. अशात सुटकेसमध्ये आढळलेलं नख दुसऱ्याच महिलेचं होतं. म्हणजेच आपल्या पतीचं दुसऱ्याच महिलेसोबत अफेअर असल्याचं तिला समजलं.

कधी खाल्ला आहे का शुद्ध शाकाहारी मासा? Vegetarian fish चा Video एकदा पाहाच

महिलेनं आपल्या सूटकेसमध्ये मिळालेलं गुलाबी नख आणि आपल्या हाताचा फोटो शेअर करत सांगितलं, की तिच्या नेलपेंटमध्येही खूप फरक आहे. अशात एखाद्या दुसऱ्या महिलेचं नख पतीच्या मोज्यापर्यंत पोहोचणं सामान्य गोष्ट नाही. यातूनच तिला आपला पती आपल्याला धोका देत असल्याचं जाणवू लागलं. यानंतर तिने पतीची पोलखोल करण्यासाठी वेगळीच पद्धत शोधली. महिलेनं नाश्त्यासाठी सँडविच बनवलं आणि नख त्याच्यामध्येच टाकलं. जेणेकरून सँडविच खाताच पतीची नजर त्याच्यावर पडेल आणि त्याचं खोटं समोर येईल. पतीने दिलेल्या धोक्यामुळे ती अतिशय दुःखी आहे. महिलेचा हा व्हिडिओ 7.9 मिलियन लोकांनी पाहिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात