Home /News /viral /

मगरीला स्वतःच्या हाताने भरवण्याची हौस अंगाशी; घसरून तरुणाचाच पाय तिच्या जबड्याजवळ गेला आणि...; Shocking Video

मगरीला स्वतःच्या हाताने भरवण्याची हौस अंगाशी; घसरून तरुणाचाच पाय तिच्या जबड्याजवळ गेला आणि...; Shocking Video

मगरीला स्वतःच्या हाताने खाणं भरवताना आपल्यासोबत असं काही घडेल याचा विचारही तरुणाने केला नव्हता.

  मुंबई, 27 जानेवारी :  अनेकांचं प्राण्यांवर इतकं प्रेम असतं की अगदी आपल्या मुलांना भरवावं तसं ते आपल्या हातांनी प्राण्यांनाही भरवतात. कुत्रे, मांजर, माकड यांना स्वतःच्या हातांनी भरवणाऱ्या लोकांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत असतात. पण एखाद्या मगरीला (Crocodile video) आपल्या हातांनी भरवावं याचा स्वप्नातही कधी कुणी विचार करणार नाही. पण एका तरुणाने तशी डेअरिंग केली (Crocodile attack video) . मगरी आपल्या हातांनी खाणं भरवायला गेलेल्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Crocodile attack on man while feeding). धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे. नॅशनल पार्कमध्ये आपण मगरींना लांबून पाहिलं तरी धडकी भरते. मगरींच्या हल्ल्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल होत असतात. मगर अगदी हुशारीने एका फटक्यात कशी शिकार करते हे आपल्याला माहितीच आहेत. त्यात त्या मगरी भुकेल्या असतील आणि आपण त्यांच्यासमोर गेलो तर मग काही खरं नाही. अशाच भुकेल्या मगरीला हा तरुण खायला द्यायला गेला. हे वाचा - मांजरासाठी तरुणाची धडपड, तोंडात तोंड टाकून आपला श्वासही दिला पण...; भावुक VIDEO तरुण पाण्याच्या किनाऱ्याजवळ हातात मांसाचा तुकडा घेऊन उभा होता. इतक्यात पाण्यातून हळूहळू मगर किनाऱ्यावर आली. त्यावेळी तरुणाने तिच्या जबड्यात तो तुकडा टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा अचानक मगरीने त्या तरुणावर हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी म्हणून तरुण तिथून उठत होता. त्याचवेळी तो घसरला आणि त्याचा पाय मगरीच्या जबड्याजवळ आला. यावेळी मात्र आपल्याही काळजाचा ठोका चुकतो.
  त्याचा पाय मगरीच्या इतक्या जवळ होता की तिने जबड्यात धरून त्याला खेचलंही असतं. त्याचं नशीब चांगलं म्हणून मांसाच्या तुकड्याऐवजी तो मगरीचा भक्ष्य झाला नाही.  सुदैवाने कसंबसं करून तरुण तिथून लगेच उठला आणि मगरीपासून दूर झाला. हे वाचा - वादळाला कॅमेऱ्यात कैद करताना ते घोंगावत तिच्याजवळच आलं आणि...; खरतनाक LIVE VIDEO discoversharks इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वांनाच गाम फुटला आहे. तरुणाने मगरीच्या इतकं जवळ जाऊन तिला खायला देण्याचा मूर्खपणा करावाच का? असा संतप्त सवाल काही युझर्सनी केला आहे. तर काहींनी आता हा तरुण पुन्हा मगरीला भरवायला जाणार नाही, अशी मजेशीर प्रतिक्रियाही दिली आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या