मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Birthday आहे मालकाचा! कुत्र्याचं सेलिब्रेशन पाहून तुम्हीही अवाक व्हाल; पाहा भन्नाट VIDEO

Birthday आहे मालकाचा! कुत्र्याचं सेलिब्रेशन पाहून तुम्हीही अवाक व्हाल; पाहा भन्नाट VIDEO

मालकाच्या वाढदिवशी कुत्र्याने उत्साहात जे केलं ते पाहून सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत.

मालकाच्या वाढदिवशी कुत्र्याने उत्साहात जे केलं ते पाहून सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत.

मालकाच्या वाढदिवशी कुत्र्याने उत्साहात जे केलं ते पाहून सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 18 डिसेंबर : बऱ्याच लोकांना कुत्रे-मांजर असे प्राणी पाळण्याची (Pet animal video) आवड असते. काही जण तर अगदी त्यांचा आपल्या मुलांप्रमाणेच सांभाळ करतात. त्यामुळे  कुत्र्यांचाही (Dog video) आपल्या मालकावर खूप जीव जडलेला असतो. आपल्या मालकासाठी शक्य ते सर्वकाही करण्याचा प्रयत्न ते करताना दिसतात. कुत्र्यांचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral video) होत आहे, ज्यात कुत्रा आपल्या मालकाचा बर्थडे साजरा करताना दिसला (Dog birthday video).

माणसांना तुम्ही कुत्रा-मांजरांचे बर्थडे सेलिब्रेट करताना पाहिलं असेल. त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर आहेत. पण आता एका कुत्र्याने आपल्या मालकाचा बर्थडे सेलिब्रेट केला आहे. कदाचित असा व्हिडीओ तुम्ही कधी पाहिला नसावा. व्हिडीओ पाहिल्यानंतर मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. चेहऱ्यावर थोडं हसू येतं.

व्हिडीओत पाहू शकता एक महिला केक कापताना दिसते आहे. त्यावेळी सर्वजण टाळ्या वाजवून तिला विश करत असतात. त्या महिलेचा कुत्राही बर्थडे साजरात करताना तिथं उभा आहे.

हे वाचा - VIDEO - Chaka chak आजीसमोर सारा काहीच नाही; चकाचक गाण्यावर लगावले जबरदस्त ठुमके

सुरुवातीला तो सर्वांकडे पाहताना दिसतो. आपली मालकीण केक कापताच सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. तसा तोसुद्धा आपले पुढील दोन्ही पाय उचलतो आणि टाळ्या वाजवताना दिसतो. अरुणिमा नावाच्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कुणी सांगितलं की तो टाळी वाजवू शकत नाही, असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

हे वाचा - बापरे! चक्क बिबट्यासोबतच फोटो काढायला गेला आणि...; सर्वात खतरनाक सेल्फीचा VIDEO

व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स या कुत्र्याचं कौतुक करत आहे. त्यांना हा कुत्रा आणि त्याचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत खूपच आवडली आहे.

First published:

Tags: Birthday celebration, Dog, Owner of dog, Viral, Viral videos