मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! चक्क बिबट्यासोबतच फोटो काढायला गेला आणि...; सर्वात खतरनाक सेल्फीचा VIDEO

बापरे! चक्क बिबट्यासोबतच फोटो काढायला गेला आणि...; सर्वात खतरनाक सेल्फीचा VIDEO

अगदी माकडासोबत फोटो काढावा तशी ही व्यक्ती बिबट्यासोबत सेल्फी काढायला गेली.

अगदी माकडासोबत फोटो काढावा तशी ही व्यक्ती बिबट्यासोबत सेल्फी काढायला गेली.

अगदी माकडासोबत फोटो काढावा तशी ही व्यक्ती बिबट्यासोबत सेल्फी काढायला गेली.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 17 डिसेंबर : फोटो आणि सेल्फी  (Selfie video) काढायला कुणाला आवडत नाही. एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो की सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. एका व्यक्तीनेही असाच सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याचा सेल्फी पाहाल तर हा जगातला सर्वात खतरनाक सेल्फी आहे, असंच तुम्हीही म्हणाल. कारण या व्यक्तीने चक्क एका बिबट्यासोबत (leopard video)  सेल्फी (Selfie with leopard video) घेतला आहे.

वाघ, बिबट्या, सिंह असे प्राणी आपल्याला जंगल सफारी, नॅशनल पार्क, प्राणीसंग्रहायलयात पाहायला मिळतात. त्यामुळे ते समोर दिसताच त्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पण अशा प्राण्यांसोबत सेल्फी घेण्याची कुणी हिंमत करेल का? पण या व्यक्तीने ती केली. अगदी माकडासमोर उभं राहून सेल्फी घ्यावा तसं त्याने या बिबट्यासोबत सेल्फी घेतला. व्हिडीओ पाहून अंगावर काटच येईल.

व्हिडीओत पाहू शकता काही लोक जीपमधून जंगल सफारी कऱण्यासाठी आले आहेत. त्यावेळी त्यांना एक बिबट्या दिसतो. बिबट्या दिसताच आपल्या हातातील कॅमेरा घेऊन ते त्याचा व्हिडीओ बनवू लागतात, फोटो काढतात. इतक्यात तो बिबट्या त्या जीपजवळ येतो. फक्त जीपजवळ येत नाही तर जीपच्या आत घुसतो.

हे वाचा - म्हशीनं वाचवले कासवाचे प्राण, लोकांनी आनंदानं केला जल्लोष; पाहा VIDEO

बिबट्या जीपमध्ये घुसून वरच्या बाजूने बसून राहतो. त्याला पाहून जीममध्ये बसलेल्या सर्वांनाच घाम फुटतो. फोटो आणि व्हिडीओ कसले सर्वजण आपला जीव मुठीत धरून बसलेले असतात. पण एक व्यक्ती मात्र त्या बिबट्याच्या समोर येते. आपला मोबाईल हातात घेऊन उभी राहते. त्या व्यक्तीच्या मागे बिबट्या असतो. बिबट्यासोबत ती व्यक्ती सेल्फी घेताना दिसते. या व्यक्तीचा व्हिडीओ बनवणारी व्यक्ती आपला कॅमेरा जीपमधील इतर व्यक्तींच्या दिशेने फिरवते, तेव्हा पाहू शकता ही जीपमधील सर्वांची अवस्था कशी झाली आहे.

हे वाचा - VIDEO - ना पोळपाट लाटणं ना रोटी मेकर, हवेत पीठ उडवत त्याने बनवली चपाती

प्रकाश अगरवाल नावाच्या फेसबुक युझरने आपल्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पाहून या तरुणाच्या डेअरिंगला बहुतेकांनी दाद दिली आहे. कुणी त्याला शेरदिल म्हटलं तर कुणी जिगरबाज. सेल्फी असावा तर असा अशी प्रतिक्रियाही काही युझर्सनी दिली आहे.

First published:

Tags: Leopard, Viral, Viral videos