Home /News /viral /

VIDEO - Chaka chak आजीसमोर सारा अली खान काहीच नाही; चकाचक गाण्यावर लगावले जबरदस्त ठुमके

VIDEO - Chaka chak आजीसमोर सारा अली खान काहीच नाही; चकाचक गाण्यावर लगावले जबरदस्त ठुमके

63 वर्षांच्या आजीने अगदी सारा अली खानप्रमाणे चकाचक गाण्याच्या स्टेप्स केला आहे.

  मुंबई, 17 डिसेंबर : सध्या सोशल मीडियावर (Social media) सारा अली खानचं (Sara ali khan) चकाचक (Chaka chak song) गाणं धुमाकूळ घालतं आहे. या गाण्याने सर्वांना वेड लावलं आहे. साराप्रमाणे बरेच सोशल मीडिया युझर्स या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर या गाण्यावर डान्स (Chaka chak dance video) करतानाचे किती तरी व्हिडीओ आहेत. अशाच एका व्हिडीओत एका आजीबाईने या गाण्यावर डान्स केला आहे (Dancing dadi dance on Chaka chak song). 63 वर्षांच्या रवी बाला ज्या डान्सिंग दादी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर त्यांचे डान्सचे बरेच व्हिडीओ आहेत. नव्या - जुन्या सर्व गाण्यांवर त्या डान्स करताना दिसतात. नुकतंच सारा अली खानचं चकाचक गाणं झालं आहे. या गाण्यावरही थिरकण्यापासून आजी स्वतःला रोखू शकली नाही. या गाण्यावरही आजीने जबरदस्त ठुमके लगावले आहेत.
  व्हिडीओत पाहू शकता गाण्यात सारा जशी हिरव्या रंगाची साडी नेसली आहे, अगदी तशीच साडी आजीही नेसली आहे आणि सारा जशा या गाण्यावर स्टेप्स करताना दिसते, अगदी तशाच स्टेप्स या आजीही करते आहे. हे वाचा - VIDEO - ना पोळपाट लाटणं ना रोटी मेकर, हवेत पीठ उडवत त्याने बनवली चपाती आजी आणि साराचा डान्स पाहिला तर वयाच्या मानाने आजी कितीतरी पटीने सारापेक्षा चांगला डान्स करते आहे, असंच वाटतं. अगदी या चकाचक आजीसमोर चकाचक साराही फेल वाटते. सारापेक्षा जास्त लक्ष हे या आजीकडेच जातं.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Dance video, Viral, Viral videos

  पुढील बातम्या