जाहिरात
मराठी बातम्या / Viral / श्वानावर जडलं पोपटाचं प्रेम; अनोख्या अंदाजात केलं प्रपोज, VIDEO जिंकेल तुमचं मन

श्वानावर जडलं पोपटाचं प्रेम; अनोख्या अंदाजात केलं प्रपोज, VIDEO जिंकेल तुमचं मन

श्वानावर जडलं पोपटाचं प्रेम; अनोख्या अंदाजात केलं प्रपोज, VIDEO जिंकेल तुमचं मन

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Viral Video of Parrot) तुम्ही पाहू शकता की एक पांढऱ्या रंगाचा पोपट आपल्या मालकिणीच्या मांडीवर बसून काळ्या रंगाच्या श्वानाला बघत राहातो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 18 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) सतत काही ना काही वेगळे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos) होताना पाहायला मिळतात. आजच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक रातोरात स्टार बनतात. मात्र, सध्या कोणत्या व्यक्तीचा नाही, तर एका पोपटाचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. या पोपटाचा अनोखा अंदाज तुमचंही मन जिंकेल. या जगात फक्त माणूसच प्रेम करू शकतो, असं तुम्हाला वाटत असेल. मात्र, हे अगदी चुकीचं आहे. कारण माणसाप्रमाणेच प्राणी आणि पक्षांनाही प्रेम होऊ शकतं. अनेकदा हे प्राणी आणि पक्षी असं काही करतात जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक पोपट मालकाच्या मांडीवर बसलेल्या श्वानाला प्रपोज करताना दिसत आहे (Parrot Praposed to a Dog). OMG! पळता पळता अचानक हवेतच उडू लागलं हरिण; कधीच पाहिला नसेल असा अद्भुत VIDEO व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Viral Video of Parrot) तुम्ही पाहू शकता की एक पांढऱ्या रंगाचा पोपट आपल्या मालकिणीच्या मांडीवर बसून काळ्या रंगाच्या श्वानाला बघत राहातो. यानंतर मालकीण त्याला म्हणते, डॉगीला सांग की तू त्याच्यावर खूप प्रेम करतो. हे ऐकताच पोपट डॉगीच्या कानाला अतिशय प्रेमाने कुरवळत त्याला आय लव्ह यू म्हणतो.

जाहिरात

हा अनोखा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं, पक्षी आणि प्राण्याच्या या प्रेमळ व्हिडिओनं माझं मन जिंकलं. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, आजपर्यंत फक्त ऐकलं होतं की पशु-पक्षी एकमेकांवर प्रेम करतात. मात्र आज डोळ्यांनी पाहिलं. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

जावयाचा असा पाहुणचार; VIDEO पाहून म्हणाल, ‘असं सासर आपल्यालाही हवं राव’

हा मनमोहक व्हिडिओ सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर @animalshigh नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला मजेशीर कॅप्शनही दिलं गेलं आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 1 लाख 20 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर 8 हजारहून अधिकांनी लाईकही केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात