मुंबई, 17 जानेवारी : हरणाला पळताना तुम्ही पाहिलं असेल तसा हरणांचा पळण्याचा वेग हा तसा कमी नसतो (Deer Jumping Video). सध्या अशाच एका हरणाच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्याच्या उडीची चांगलीच चर्चा होते आहे. आता हरणाने उडी मारणं यात काय विशेष आहे. हरणाला उडी मारताना तर आपण नेहमी पाहतो, असं तुम्हाला वाटेल. पण या हरणाची उडी तशी खासच आहे. कारण त्याची उडी म्हणजे फक्त उडी नाही तर तो चक्क उडताना दिसला आहे (Deer Flying Video). कधी हरणाला हवेत उडताना पाहिलं आहे का? काहीही, हरण कसं काय हवेत उडू शकतं , त्याला थोडी पंख असतात असंच तुम्ही म्हणाल. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही (Weird Animal Videos). हवेत उडणाऱ्या हरणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या हरणाने इतकी उंच उडी मारली आहे की की ते अगदी हवेतच उडत आहे असं दिसतं आहे (Deer Amazing Jump Looks Like Flying). हे वाचा - Shocking! चक्क मगरीसोबत मस्ती करायला गेला; काय भयंकर अवस्था झाली पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता एक हरण जंगलाच्या एका बाजूने धावत रस्त्याच्या दिशेने येतो. रस्त्याजवळ येताच त्याला तिथं काही गाड्या, लोक दिसतात. त्यांना पाहताच आपला जीव वाचवण्यासाठी म्हणून तो पळता पळता उडी मारतो. तो इतकी उंच उडी मारतो की पाहूनच थक्क व्हाल. इतकी उंच उडी मारायची म्हणजे अगदी दूरून पळत येत उडी मारावी लागते. पण या हरणाने अगदी कमी वेळेत कमी अंतरातच इतकी उंच उडी मारली.
And the gold medal for long & high jump goes to.......@ParveenKaswan
— WildLense® Eco Foundation 🇮🇳 (@WildLense_India) January 15, 2022
Forwarded as received pic.twitter.com/iY8u37KUxB
अंदाजे कमीत कमी 10 फूट किंवा त्यापेक्षाही जास्त उंचीवर या हरणाने उडी मारली असावी. उडी मारल्यानंतर किती तरी वेळ तो हवेत तसाच राहतो. त्यानंतर थेट जातो तो रस्त्याच्या पलिकडे असलेल्या जंगलाच्या भागात. तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात हे अद्भुत दृश्य कैद केलं. वाइल्ड लेन्स इंडिया नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. लाँग आणि हाय जम्पसाठी या हरणाला गोल्ड मेडल मिळावं, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हे वाचा - काय सांगता! चक्क माकडाने उडवली पतंग; VIDEO पाहून बसणार नाही डोळ्यावर विश्वास हा व्हिडीओ पाहणारे बहुतेक नेटिझन्स आश्चर्यचकित झले आहेत. एका युझरने हा एखाद्या अॅक्शन फिल्ममधील सीन असावा असं म्हटलं आहे. एका युझरने या हरणाने ऑलिम्पिक मेडल जिंकणऱ्या खेळाडूंनाही मात दिल्याचं म्हटलं आहे. तर एकाने ही हरणाची फक्त उडी नाही तर हरण हवेतच उडत असल्याचं म्हटलं आहे.