Home /News /lifestyle /

व्वा क्या बात है! जावयाचा असा पाहुणचार; VIDEO पाहून म्हणाल, 'असं सासर आपल्यालाही हवं राव'

व्वा क्या बात है! जावयाचा असा पाहुणचार; VIDEO पाहून म्हणाल, 'असं सासर आपल्यालाही हवं राव'

सासरी झालेला पाहुणचार पाहूनच जावयाचं पोट भरलं.

    तेलंगाणा, 17 जानेवारी : जावई (son in law) घरी येणार म्हटल्यावर प्रत्येक मुलीचे आई-वडील त्याच्या मानपानाची काळजी घेतातच. मग लाडक्या मुलीच्या आवडीनिवडी राहिल्या बाजूला त्यापेक्षा जावयाच्या आवडीनिवडी विचारात घेतल्या जातात (son in law grand welcome at in law's house). जावयाला काय हवं, काय नको, त्याला कसली कमी पडायला नको, त्याला जे जे काही हवं ते मिळावं, यासाठी सासू-सासऱ्यांची धडपड सुरू असते. जावई घरी आला की त्याच्या आवडीचेच पदार्थ घरी बनतात आणि अगदी ताटभरून जावयाला जेवायला दिलं जातं (365 Dishes for son in law). सध्या सोशल मीडियावर अशा जावयाचा अशा पाहुणचारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो तुम्ही कधीच पाहिला नसेल. जावई येणार म्हणून फक्त ताटभर पंचपक्वान नव्हे तर तब्बल टेबलभर 365 व्यंजन तयार करण्यात आले.  बरं पदार्थ फक्त केलेच नाही तर ते सजवून त्याची नीट मांडणीही केली. आंध्र प्रदेशच्या पश्चिमी गोदावरी जिल्ह्यातील नरसापुरममधील अत्यम वेंकटेश्वर राव आणि माधवी यांची मुलगी कुंदवी आणि तुम्मपल्ली सुब्रह्मण्यम आणि अन्नपूर्ण यांचा मुलगा साईकृष्ण यांचं लवकर लग्न होणार आहे. लग्नाआधी संक्रांतीचा सण आल्याने कुंदवीच्या आजीआजोबा अंचता गोविंद आणि नंदामणी यांनी आपल्या होणाऱ्या जावयाचा पाहुणचार करायचं ठरवलं. हे वाचा - जर तुम्ही महिनाभर काहीच गोड खाल्लं नाही तर...काय होईल नेमकं?, Must Read संक्रांतीच्या निमित्ताने होणाऱ्या जावयाला या कुटुंबाने रविवारी घरी जेवणासाठी बोलावलं. जावयासाठी त्यांनी 365 प्रकारचे पक्वान बनवले. यामध्ये 30 प्रकारच्या करी, 100 प्रकारचे गोड पदार्थ, 15 प्रकारच्या आईस्क्रीम, 35 प्रकारचे कोल्ड ड्रिंक, 35 प्रकारचे बिस्किट्स, 15 प्रकारचे केक, 75 प्रकारचे इतर गरमागरम पदार्थ आणि बऱ्याच प्रकारच्या पदार्थांचा समावेश होता.  यामध्ये भात, पुलीहोरा, बिर्याणी, चपाती, पराठा, बटर नान, तंदुरी रोटी असे बरेच पदार्थ होते. सर्वच्या सर्व व्हेजिटेरिअन डिशेस बनवण्यात आले होते. हे पदार्थ चांदीच्या भांड्यात सर्व्ह करण्यात आले. वर्षाचे 365 दिवस असतात आणि दरदिवशी काही ना काही वेगळं खाण्याची इच्छा असते. हेच लक्षात घेत होणाऱ्या जावयासाठी इतके पदार्थ बनवल्याचं या कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं. हे वाचा - विश्वास बसणार नाही! असे फोटो विकून तरुण झाला मालामाल; 5 दिवसांतच कमावले कोट्यवधी आजीआजोबांनी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला  दिलेलं सरप्राईझ पाहून नवरीबाई आनंदी झाली. तर जावयाचं न खाता फक्त पदार्थ पाहूनच पोट भरलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Andhra pradesh, Marriage, Relationship, Wedding, Wife and husband

    पुढील बातम्या