जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ...आणि अचानक आकाशातून खाली पडताना दिसली उल्का, पहिल्यांदाच कॅमेऱ्यात टिपला अद्भुत VIDEO

...आणि अचानक आकाशातून खाली पडताना दिसली उल्का, पहिल्यांदाच कॅमेऱ्यात टिपला अद्भुत VIDEO

...आणि अचानक आकाशातून खाली पडताना दिसली उल्का, पहिल्यांदाच कॅमेऱ्यात टिपला अद्भुत VIDEO

हा व्हिडीओ संगीतकार अंबर कॉफमॅनने आपल्या कॅमऱ्याच टिपला आहे. हा व्हिडीओ न्यू मेक्सिकोच्या ताओस येथे शूट करण्यात आला आहे. क्वचितच असे क्षण कॅमेऱ्यात टिपले जातात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मेक्सिको , 31 जुलै: आकाशात विविध गोष्टी घडत असतात. मात्र खगोल प्रेमींसाठी एक अद्भुत व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उल्का वर्षाव (Meteor Shower) होताना दिसत आहे. हा व्हिडीओ संगीतकार अंबर कॉफमॅनने आपल्या कॅमऱ्याच टिपला आहे. हा व्हिडीओ न्यू मेक्सिकोच्या ताओस येथे शूट करण्यात आला आहे. क्वचितच असे क्षण कॅमेऱ्यात टिपले जातात. त्यामुळे हा अद्भुत व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अपलोड करातान कॉफमॅननं, मित्रांनो, मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात कधीही न पाहिलेली एक गोष्ट आज पाहिली. आणि मी याचा व्हिडीओही काढला आहे, असे कॅप्शन लिहिले आहे. वाचा- चालकाच्या डोळ्यादेखत पडली 11 हजार वोल्टची वीजेची तार, बर्निंग ट्रकचा थरारक VIDEO तसेच कॉफमॅन सांगितले की, ‘ही उल्का येथील राष्ट्रीय वन पर्वताच्या शिखरावरुन खाली पडताना दिसत आहे. त्याचे नेमके स्थान सांगणे थोडे कठीण जाईल’. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतआहे की, उल्काचा प्रकाश पडताना दिसत आहे. ही उल्का खाली पडतानाही दिसत आहे. हा व्हिडीओ शूट करताना कॉफमॅनच्या मागून एका महिलेचा आवाज येत आहे. घाबरलेल्या अवस्थेत ही महिला, हे काय होतं? असे प्रश्न विचारत आहे. वाचा- CCTV VIDEO: हम तो उड गये! हवेत उडून महिलेवर आदळला रिक्षा चालक

जाहिरात

वाचा- पाण्यात दोन सापांमध्ये खतरनाक राडा, हवेतून केला वार; थरारक VIDEO VIRAL टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, डॉक्टर जेम्स ओ डोगू यांनी सांगितले की, ‘अंबर यांनी हे चित्र योग्य प्रकारे कॅमेऱ्यात टिपले. उल्का प्रति सेकंद सुमारे 10-75 किलोमीटर अंतरावर आपल्या वातावरणात प्रवेश करतात. मला वाटते की ज्यावेळी हा व्हिडीओ रेकॉर्ड झाला तेव्हा उल्काची गती कमी होती. वाचा- मध्यरात्री रुग्णालयातून येत होता किंचाळण्याचा आवाज, VIDEO VIRAL झाला आणि… अमेरिकन उल्का सोसायटीच्या (AMS) म्हणण्यानुसार, सदर्न डेल्टा Aquarids आणि अल्फा मकरिड्स या दोन उल्का या आठवड्याच्या सुरूवातीस आकाशात दिसणार होत्या. मात्र अंबर यांनी रेकॉर्ड केलेल्या या 7 सेकंदाच्या व्हिडीओमुळे लोकांना हा अद्भुत क्षण अनुभवता आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात