Home /News /viral /

मध्यरात्री रुग्णालयातून येत होता किंचाळण्याचा आवाज, VIDEO VIRAL झाल्यानंतर समोर आलं धक्कादायक कारण

मध्यरात्री रुग्णालयातून येत होता किंचाळण्याचा आवाज, VIDEO VIRAL झाल्यानंतर समोर आलं धक्कादायक कारण

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विचित्र आवाज येताना ऐकू येत आहेत. मात्र रुग्णालयानं तपासणी केल्यानंतर एक वेगळाच प्रकार समोर आला.

    इंदूर, 28 जुलै : भूत आहेत की नाहीत याबद्दल नेहमीच वाद होत असतो. विज्ञान म्हणते की भूत आणि आत्मा यासारखी कोणतीही गोष्ट नाही, हा मनाचा भ्रम आहे तर जगभरात असे बरेच लोक आहेत ज्यांचा या गोष्टींवर विश्वास आहे. असाच एक भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये कोणीतरी ओरडत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येत आहे. मुख्य म्हणजे हा आवाज फक्त रात्रीच ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. हे प्रकरण मध्य प्रदेशातील इंदूर येथील एमवाय हॉस्पिटलचे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हॉस्पिटलच्या तळघरातून कुणीतरी ओरडण्याचे आवाज ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे रुग्णालयातील रुग्ण आणि डॉक्टरही घाबरले. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओंद्वारे एक कहाणीही व्हायरल झाली आहे, जी थक्क करणारी आहे. असे सांगितले जात आहे की, 15-20 दिवसांपूर्वी, 90 टक्के भाजलेली महिला या रुग्णालयात आली, मात्र तिचा उपचारादरम्यान काही तासांतच मृत्यू झाला. यानंतर, कुटुंबीयांनी या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. मात्र त्या दिवसांपासूनच रुग्णालयात ओरडण्याचा आवाज येत असल्याचा दावा केला जात होता. वाचा-खड्ड्यात अडकला 7 वर्षांचा मुलगा, जमिनीतून बाहेर आला फक्त एक हात! पाहा VIDEO वाचा-लोकांपासून इतका लांब जाऊन बसला की इंटरनेटवर VIDEO भन्नाट व्हायरल या व्हिडीओमुळे रुग्णालयातील रुग्ण घाबरले होते. त्यामुळे रूग्णालय प्रशासनानेही कारवाईचा बडगा उगारला आणि एक तपास पथक स्थापन केले. या पथकाला जे काही कळले, ते पाहून सगळ्यांना धक्का बसला. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ रुग्णालयातील ऑर्थोपेडिक्स विभागात दाखल झालेल्या एका रुग्णाच्या आवाजाचा होता. रोज रात्री ड्रेसिंग करताना हा रुग्ण ओरडायचा, आणि रात्री शांतता असल्यामुळे या रुग्णाचा आवाज घुमत होता. वाचा-पुण्यात पुरंदरमध्ये पाहायला मिळाला निसर्गाचा चमत्कार, पाहा हा VIDEO दरम्यान, आता रुग्णालय प्रशासन भुत असल्याची अफवा पसरविणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. हॉस्पिटलचे अधिक्षक डॉ. पी एस ठाकूर यांनी सांगितले की, रुग्णालयाची रचना जुनी आहे आणि व्हेंटिलेटर असल्यामुळे या रुग्णांचा आवाज घुमत होता. यावरून कोणीतरी भुतांच्या अफवा पसरवल्या आहेत. आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या