जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चालकाच्या डोळ्यादेखत पडली 11 हजार वोल्टची वीजेची तार, बर्निंग ट्रकचा थरारक VIDEO VIRAL

चालकाच्या डोळ्यादेखत पडली 11 हजार वोल्टची वीजेची तार, बर्निंग ट्रकचा थरारक VIDEO VIRAL

चालकाच्या डोळ्यादेखत पडली 11 हजार वोल्टची वीजेची तार, बर्निंग ट्रकचा थरारक VIDEO VIRAL

अचानक 11 हजार व्होल्टची हायटेंशन विद्युत तार तुटून ट्रकवर कोसळली. या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुजफ्फरपूर, 31 जुलै: वीज विभागाच्या दुर्लक्षामुळे एक मोठा अपघात झाला. तीन डंपर एका क्षणात जळून खाक झाले. तर, एका ट्राकजळणारे ट्रक एकत्र झाले, तर एक ट्रकचालक जिवंत जळू लागला. ही घटना कांटी पोलीस स्थानकाच्या जवळ घडली. कंत्राटदार मुरारी झा यांची वाहने ब्लॉक ऑफिसलगत रस्त्यावर पार्क केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक 11 हजार व्होल्टची हायटेंशन विद्युत तार तुटून ट्रकवर कोसळली, यामुळे तिन्ही ट्रक जळून खाक झाल्या. यावेळी, 11 हजार व्होल्ट वायरमधून निघणाऱ्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला. ट्रक जळत असताना आणि वायरमधून आवाज येत असल्याचे सांगितले जात आहे. हा आवाज ऐकून लोकांनी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या कांती पॉवर सब स्टेशनला माहिती मिळाली. सबस्टेशनने वीज बंद केल्यानं चालक थोडक्यात वाचला. .घटनेसंदर्भात मुरारी झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात एकूण 10 लोक जखमी झाले आहेत. सगळ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा- चालत्या गाडीतून पडला प्रवाशी, ट्रेनखाली जाणार तेवढ्यात जवानाने वाचवले प्राण

जाहिरात

वाचा- CCTV VIDEO: हम तो उड गये! हवेत उडून महिलेवर आदळला रिक्षा चालक मात्र, वीजसेवा खंडीत केल्यानंतर आग विझविण्यात आली मात्र वीज विभागाविरुद्ध टीका केली जात आहे. दरम्यान, हा अपघात घडण्याच्या एक दिवस आधी 11000 हाय-टेंशन वायर तुटली होती. कांती पोलीस स्टेशन कुंदन कुमार यांनी घटनेची माहिती दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी कोणतीही लेखी तक्रार दाखल केलेली नाही आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात