बंगळुरू, 31 जुलै : सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र असा व्हिडीओ तुम्ही कधीच पाहिला नसेल. बंगळुरूमध्ये एक विचित्र घटना घडली. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक रिक्षावाला रस्त्यावर असलेल्या वीजेच्या व्हायरला अडकून दूरवर उभा असलेल्या महिलेच्या अंगावर जाऊन पडतो. हा व्हिडीओ पाहून, ही घटना खरच घडली आहे? यावर तुमचा विश्वासही बसणार नाही.
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना कोलार येथील टीसी पायला रोड येथे घडली. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक रिक्षा चालक उभा असताना, बाजूला हवेत तरंगणाऱ्या व्हायरवर त्याचा पाय पडतो. पाय पडताच रिक्षा चालक हवेत फेकला गेला, आणि रस्त्यावर चालत असलेल्या महिलेच्या अंगावर जाऊन पडला. या भयंकर अपघातात रिक्षा चालक आणि महिला दोघंही गंभीर जखमी झाले आहेत.
वाचा-पाण्यात दोन सापांमध्ये खतरनाक राडा, हवेतून केला वार; थरारक VIDEO VIRAL
ही घटना 16 जुलै रोजी घडली. 42 वर्षीय महिला सुनिता यांच्या अंगावर रिक्षा चालक येऊन पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. त्यांनी बंगळुरू मिररला दिलेल्या माहितीत, मला एक क्षण काही कळलेच नाही. सगळं इतकं अचानक घडलं, असे सांगितले. या सुनिता यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांना तब्बल 52 टाके पडले आहेत.
वाचा-5 सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली 3 मजली इमारत, दुर्घटनेचा LIVE VIDEO
CCTV visuals from Kolar, a auto driver flown in air because of unfixed cable wire suddenly stuck and threw auto driver on a lady walking on foot path in kolar pic.twitter.com/adExAkuZMi
— Hari Pr.Bharatee (@hpbharatee) July 30, 2020
वाचा-मध्यरात्री रुग्णालयातून येत होता किंचाळण्याचा आवाज, VIDEO VIRAL झाला आणि...
या घटनेनंतर रस्त्यावर पडलेल्या ओव्हरहेड केबल वेळच्या वेळी का नाही काढून टाकल्या जात? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ही घटना घडल्यानंतर सामान्य जनताही संतापली आहे. हा मोठा अपघात होऊ शकला असता, मात्र सुनिता यांचा जीव थोडक्यात वाचला.