आज शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पंढरपूर तालुक्यातील बाजीरावची विहीर येथे शेळवे गावालगत शरद पवारांचा भरधाव जाणारा ताफा अचानक थांबला. धक्कादायक! कोरोना रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात शरद पवारांचा ताफा थांबवण्याचे कारणही तसेच होते. शेळवे गावात राहणारे 87 वर्षांचे पांडुरंग गाजरे हे शरद पवारांना खूप प्रेम करतात. ज्या ज्या वेळी शरद पवार हे पंढरपूरच्या दौऱ्यावर येतात तेव्हा आवर्जून गाजरे यांची भेट घेत असतात. त्यामुळे महामार्गावर राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांसह पांडुरंग गाजरे हे उभे होते. कार्यकर्ते राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन उभे होते. दूरुनच पवारांना याचा अंदाजा आला आणि त्यांनी ताफा थांबवण्यास सांगितले. यावेळी पवारांच्या गाडीत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे सुद्धा होते. मानलं पुणेकराला, कोरोनाबाधित आजींना पाठीवर बसून डोंगरावरून खाली आणलं शरद पवारांनी गाडीतूनच पांडुरंग गाजरे यांची आपुलकीने विचारपूस केली. तब्येची माहिती जाणून घेतली. पांडुरंग गाजरे यांनी एक निवदेनही दिलं, पवारांनी त्यांचं निवदेनही स्वीकारलं. त्यानंतर शरद पवारांचा आला तसा ताफा पुन्हा सुसाट वेगाने पुढच्या दिशेनं निघाला. शरद पवारांचा ताफा थांबलेला पाहून कार्यकर्तेही भारावून गेले होते.पंढरपूर : शरद पवारांनी ताफा थांबवून आपल्यावर प्रेम करणाऱ्या 87 वर्षांच्या पांडुरंग गाजरे यांची केली विचारपूस pic.twitter.com/ml9bfIuNsL
— News18Lokmat (@News18lokmat) July 19, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pandharpur, Sharad pawar, पंढरपूर, राष्ट्रवादी