जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धक्कादायक! कोरोना रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात

धक्कादायक! कोरोना रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात

धक्कादायक! कोरोना रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात

पालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीने रुग्णवाहिकेला धडक दिल्याने हा अपघात झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

अंबरनाथ, 19 जुलै : कोरोना रुग्णाला उपचारार्थ रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अंबरनाथमध्ये अपघात आहे. अंबरनाथ पालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीने रुग्णवाहिकेला धडक दिल्याने हा अपघात झाला. ही रुग्णवाहिका बदलापूर येथून एका कोरोना रुग्णाला घेऊन उल्हासनगरच्या रुग्णालयात निघाली होती. रुग्णवाहिका अंबरनाथ पूर्वेच्या गोविंद पुलाजवळील रस्त्यावर आली असता याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या अंबरनाथ पालिकेच्या घंटागाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात ॲम्बुलन्स चालक आणि घंटा गाडीतील इतर तीन जणांना दुखापत झाली आहे. सुदैवाची बाब म्हणजे ॲम्बुलन्समध्ये असणाऱ्या कोरोना रुग्णाला कोणतीही दुखापत झाली नसून तो थोडक्यात बचावला आहे. अपघातामध्ये घंटागाडी आणि अंबुलन्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हेही वाचा - FACT CHECK : 21 तारखेपासून 100 टक्के लॉकडाऊन? चर्चेवर थेट जयंत पाटलांनीच केला खुलासा दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवलं आहे. याप्रकरणी रुग्णवाहिकेला धडक देणाऱ्या घंटागाडीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात