पुणे, 19 जुलै : पुण्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पुण्यातील पर्वती भागात एका वयोवद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली, पण स्ट्रेचर तिच्या घरापर्यंत पोहचू शकत नव्हते. त्यामुळे एका तरुणाने आजीबाईंना थेट पाठीवर बसवून खाली आणले. निलेश पवार असं या कोरोना योद्ध्याचं नावं आहे.
घडलेली हकीकत अशी की, पुण्यात पर्वती जनता वसाहतीमध्ये ही घटना घडली आहे. एक वयोवृद्ध महिला घरात तापाने फणफणलेली होती. एवढंच नाहीतर ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं होतं. या आजींना घेण्यासाठी एक रुग्णवाहिका पोहोचली.
या वृद्ध महिलेची खोली उंच डोंगरावर होती तसंच तिथपर्यंत स्ट्रेचर नेणंही अवघड होतं. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही या तरुणाने मिळेल ते पीपीटी किट अंगावर चढवलं आणि कोरोना संसर्गाचा धोका पत्कारत या कोरोना पॉझिटिव्ह आजींला पाठकुळी बसवून अख्खा डोंगर उतरला.
अख्खं गाव फक्त पाहत होतं, आणि 'ती' पतीचा मृतदेह हातगाडीवर ओढत नेत होती!
निलेश पवार याच्या या धाडसाचं सर्वदूर कौतुक होत असून त्याचा हा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोरोनाच्या अनाठायी भीतीपोटी एकिकडे सामाजिक बहिष्कार टाकले जात असताना निलेशचा हा नक्कीच एक कौतुकास पात्र ठरत आहे.
आजचा दिवस पुण्यात लॉकडाउन शिथील
दरम्यान, गेल्या काही दिवसात coronavirus चा संसर्ग वेगाने वाढत असल्याने 13 जुलैपासून पुण्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडणाऱ्या किराणा आणि भाजीपाल्याची दुकानंही पहिले काही दिवस बंद होती. या कडकडीत बंदनंतर आता पुणेकरांना रविवारी थोडा दिलासा मिळणार आहे. एक दिवसापुरता लॉकडाऊन शिथिल करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे.
पुण्यातील सलोनी सातपुतेच्या 'त्या' VIRAL VIDEO मागील REAL कहाणी आली समोर
आज 19 जुलैला गटारी अमावास्यानिमित्त मटन शॉप आणि किराणा दुकानं दिवसभर खुली राहणार आहेत. पाच दिवसांच्या लॉकडाऊननंतर रविवारी दुकानांसमोर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वेळेचे निर्बंध हटवण्यात आले आहेत.
सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत मटण, मच्छीसह सर्व किराणा आणि भाजीपाल्याची दुकाननं उघडी राहतील. ही सवलत फक्त रविवारपुरती आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही सूट दिली आहे.