नवी दिल्ली, 16 एप्रिल : अपघाताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बहुतेक अपघात हे वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याने होतात. भरधाव गाड्या चावलणं, नको ते जीवघेणे स्टंट करणं, विरुद्ध मार्गाने गाड्या चालवणं अशी अपघाताची एक ना दोन तर किती तरी कारणे आहेत. पण सध्या अपघाताचा असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यात असं काहीच नाही. उलट हा अपघात नेमका झाला तरी कसा? असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. अपघाताच्या या व्हिडीओने सर्वांना गोंधळात टाकलं आहे. असा अपघात तुम्हीही आजवर कदाचित कधीच पाहिला नसेल. कारण हा अपघात म्हणजे एक रहस्यमयी घटनाच म्हणावी लागेल. अवघ्या 17 सेकंदांच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता बहुतेक सिग्नल लागला आहे आणि झेब्रा क्रॉसिंगजवळ 2 गाड्या उभ्या आहेत. मागून एक तिसरी गाडी येते आणि ती झेब्रा क्रॉसिंगवरून पुढे जाण्याचा प्रयत्न करते. पण जशी ती गाडी झेब्रा क्रॉसिंगवर येते तशी ती अचानक मागे जाते आणि हवेत उडते. …अन् भरधाव ट्रेनने क्षणात उडवल्या चिथड्या; तुम्ही अशी चूक करत नाहीत ना? अपघाताचा भयंकर LIVE VIDEO गाडीचा मागचा भाग अचानक हवेत उडतो आणि गाडी फक्त पुढच्या दोन चाकांवर असते. त्यामुळे गाडीचा तोल जातो आणि ती गोल फिरून खाली पडते. शेजारी असलेली दुसरी उभी गाडीसुद्धा या गाडीसोबत पडते. जणू काही कोणती अदृश्य शक्ती या गाडीला मागे खेचते आहे असं वाटतं. अपघात नेमका कसा झाला, याचं कारण काय? हे गूढच राहिलं आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही युझर्सनी याची तुलना हॉलिवूड फिल्म एक्स-मेनशी केली आहे, तर काहींनी हे एलियन्सचं काम असल्याचं म्हटलं आहे. तर काही लोकांना ही व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलं आहे. नशीब म्हणावं की चमत्कार! तरुणाने यमराजालाही दिला चकवा; 10 सेकंदात 2 वेळा मृत्यूवर मात; पाहा VIDEO @AbsoluteCIown या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
— Mysteries Of The Unexplained (@AbsoluteCIown) April 12, 2023
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.