जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नशीब म्हणावं की चमत्कार! तरुणाने यमराजालाही दिला चकवा; 10 सेकंदात 2 वेळा मृत्यूवर मात; पाहा VIDEO

नशीब म्हणावं की चमत्कार! तरुणाने यमराजालाही दिला चकवा; 10 सेकंदात 2 वेळा मृत्यूवर मात; पाहा VIDEO

बाईक आणि ट्रक अपघाताचा व्हिडीओ.

बाईक आणि ट्रक अपघाताचा व्हिडीओ.

भयंकर अपघातातून एकदा नव्हे तर दोनदा बाईकस्वार बचावला आहे. अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 08 एप्रिल : प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे. कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण तरी फिल्मी लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्ये असा चमत्कार दिसून आला. एका तरुणाने खरंच यमराजाला चकवा दिला आहे. अवघ्या दहा सेकंदात त्याने दोनदा मृत्यूवर मात केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. अपघाता चा हा व्हिडीओ आहे. ज्यात एका तरुणाचा भयंकर अपघात झाला. पण या अपघातातूनही हा तरुण बचावला आहे. मृत्यू अगदी त्याच्यासमोरच येऊन ठेपला होता. पण त्याने समोर आलेल्या मृत्यूला परतवून लावलं आहे. या तरुणाचं नशीब म्हणा की चमत्कार पण जे घडलं ते पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका हायवेवरचा हा व्हिडीओ आहे. रस्त्याच्या कडेला एक कार उभी आहे. ज्यातील व्यक्तीने आपला कॅमेरा ऑन ठेवला आहे. तिथं पाऊस पडतो आहे आणि पावसामुळे हायवेवर पाणीच पाणी आहे. सर्वकाही सुरळीत असतं. इतक्याच अचानक भयंकर घटना घडते. एक बाईकस्वार तरुण येतो. त्याचा मागून एक कारही येते. कार बाईकच्या जवळ जाताच बाईकवरील तरुणाचं नियंत्रण सुटतं आणि बाईकसह तो रस्त्यावर कोसळतो. मृत्यूनंतरही बायकोने नवऱ्याला सोडलं नाही; 7 दिवस त्याच्या मृतदेहासोबतच…; अंगावर काटा आणणारी घटना हायवे असल्याने सर्व गाड्या भरधाव वेगाने जात आहेत. जेव्हा बाईक कोसळली तेव्हा मागून एक भलामोठा ट्रक वेगाने येतो. ट्रक अगदी बाईकच्या जवळ येतो आणि त्याचक्षणी आपल्या काळजाचा ठोका चुकतो. सुदैवाने बाईकस्वाराचं लक्ष मागे जातं आणि तो बाईक तिथंच सोडून पटकन बाजूला होतो. ट्रकचालकही तात्काळ ब्रेक मारतो. पण तरी ट्रक इतका वेगात असतो की तो बाईकवरून थोडा पुढे गेल्यावर थांबतो. तरुण जर तिथून बाजूला झाला नसता, बाजूला होण्यात एक सेकंद जरी त्याला उशीर झाला असता तरी बाईकस्वार कदाचित ट्रकखाली चिरडला असता. पण त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला. प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी, रेल्वेसमोर उडी मारणार; तेवढ्यात…धक्कादायक CCTV VIDEO यानंतर ट्रक तिथंच थांबलेला दिसतो आणि बाईकस्वार ट्रकच्या मागे जाताना दिसतो. यानंतर ज्या गाडीतून हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे ती गाडीही तिथून निघून पुढे जाते.

जाहिरात

@whatcouIdGwrong ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात