मुंबई, 15 एप्रिल : अति घाई संकटात नेई असं म्हटलं जातं. याचा प्रत्यय देणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यात तरुणाने भरधाव ट्रेनसमोर जाण्याचं नको ते धाडस केलं. त्यानंतर ट्रेनने चिथड्याच उडवल्या. अपघाता चा हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. हृदयाची धडधड वाढेल. हा व्हिडीओ एका रेल्वे फाटकाजवळील आहे. तुम्ही पाहिलंच असेल रेल्वे येण्याच्या काही वेळाआधी रेल्वे फाटक बंद केलं जातं. तरी काही लोक बिनधास्तपणे रेल्वे फाटक ओलांडतात. पादचारीच नव्हे तर बाईकस्वारही या फाटकावरून जातात. असाच हा व्हिडीओ आहे. ज्यात एका बाईकस्वाराने फाटक बंद असताना रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जे घडलं ते शॉकिंग आहे.
व्हिडीओत पाहू शकता रेल्वे फाटक बंद आहे. फाटकाच्या पलीकडे काही वाहनचालक आणि पादचारी उभे आहेत. असं असताना समोरून एक बाईकस्वार बिनधास्तपणे येतो. तो रूळांवर येतो तितक्यात वेगाने ट्रेन येते. नशीब म्हणावं की चमत्कार! तरुणाने यमराजालाही दिला चकवा; 10 सेकंदात 2 वेळा मृत्यूवर मात; पाहा VIDEO बाईकचालकाला ट्रेन येत असल्याचं लक्षात येताच तो बाईकवरून उतरतो. बाईक तिथंच टाकून पळतो. तो बाईकवरून उतरतो आणि त्याच वेळेला ट्रेन येऊन बाईकला उडवतो आणि बाईकच्या चिथड्या उडतात. अवघ्या काही सेकंदात हे सर्व घडतं. बाईकस्वाराचं नशीब चांगलं म्हणून तो बचावतो. त्याची ही हिरोगिरी त्याच्या जीवावरही बेतली असती. फाटक बंद असताना तुम्ही असं धाडस चुकूनही करू नका. कितीही घाई असली तरी काही सेकंदही मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात.
#Alert Ranital to Khurda Road section has been upgraded for maximum permissible speed of 130 kmph, all LHB trains to run at 130 kmph in this section from tomorrow. Earlier Kharagpur to Ranital and Khurda Road to Palasa was done,so trespassing will be fatal. Always remember family pic.twitter.com/Hx6jYW9FcU
— OdishaRailUsers - Multimodal Connectivity Forum (@OdishaRail) April 12, 2023
@OdishaRail ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. व्हिडीओ तसा जुना आहे. पण जनजागृती म्हणून तो दाखवण्यात आला आहे.