मुंबई 28 ऑगस्ट 2022 : आपण कामात इतके व्यस्त असतो की, बऱ्याचदा आपल्या स्वत:कडे पाहायला देखील वेळ नसतो. टार्गेट्स, डेडलाईन, काम या सगळ्यात आपण आपल्या हेल्थकडे लक्षच देत नाही. त्यात बऱ्याचदा आपल्या झोपेच्या वेळा देखील चुकवतात. परंतू अपूर्ण झोप ही आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही, यामुळे आपल्या वेगवेगळ्या समस्या देखील उद्भवू शकतात. परंतु अपूर्ण झोपेचा आपल्या आरोग्यावरच परिणाम होत नाही, तर याचा आपल्या कामावर देखील परिणाम होतो. एवढंच काय तर याची खूप मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते. यासंबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुमच्या लक्षात येईल की, अपूर्ण झोपेच्या समस्येमुळे तुम्हाला कोणत्या गोष्टींना सामोर जावं लागू शकतं आणि याचा तुमच्या कामावर कसा परिणाम होतो. सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये एक कर्मचारी चालत्या मिनी क्रेनवर काम करत असताना झोपला आणि त्यानंतर जे घडलं ते त्याला भलतंच महागात पडलं. कारण यामुळे कंपनीचं लाखोंचं नुकसान झालं. हे वाचा : वेगवान बाईकची कारला टक्कर, त्यानंतर जे घडलं ते थक्कं करणारं; घटनेचा Video Viral खरंतर हा कर्माचारी सामान लोड करण्याचं काम करतो. क्रेनद्वारे सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हा व्यक्ती करतो. परंतु आपलं काम करताना या व्यक्तीला झोप लागते आणि तो या मिनी क्रेनवरच झोपतो, ज्यामुळे या क्रेनचा बॅलेंस बिघडतो आणि ही क्रेन सामानावर जाऊन आदळते, ज्यामुळेसंपूर्ण सामान खाली पडू लागतं, व्हिडीओमध्ये हे सहज दिसत आहे की, या व्यक्तीच्या झोपेमुळे केवढं मोठं नुकसान झालं आहे.
नशीबानं वेळीच या व्यक्तीला जाग आली आणि तो त्या ठिकाणाहून बाजूला झाला, नाहीतर ते सगळं सामान त्याच्यावर पडलं असतं. हे वाचा : आगीशी खेळणे पडलं महाग! Viral Video पाहून तुम्हाला बसेल धक्का आपल्या सर्वांना माहित आहे की, झोप ही आपल्या शरीरातील सर्वात महत्वाची क्रिया आहे, जी आपल्याला पुढील दिवसासाठी ऊर्जा देते. असे असूनही लोक झोप घेण्याकडे दुर्लक्ष करतात, ज्याचे परिणाम त्यांना नंतर भोगावे लागतात. ट्विटर cctv ediots या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो चर्चेचा विषय ठरला आहे. 20 सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत 82 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर ज्या यूजर्सनी हा व्हिडीओ पाहिला आहे, ते त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.