मराठी बातम्या /बातम्या /Viral /आगीशी खेळणे पडलं महाग! Viral Video पाहून तुम्हाला बसेल धक्का

आगीशी खेळणे पडलं महाग! Viral Video पाहून तुम्हाला बसेल धक्का

आगीचे स्टंट करताना योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक असतं. खबरदारी घेतली नाही, तर काय होऊ शकतं, हे दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल (Video Viral) झालाय

आगीचे स्टंट करताना योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक असतं. खबरदारी घेतली नाही, तर काय होऊ शकतं, हे दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल (Video Viral) झालाय

आगीचे स्टंट करताना योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक असतं. खबरदारी घेतली नाही, तर काय होऊ शकतं, हे दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल (Video Viral) झालाय

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    आमुंबई, 27 ऑगस्ट : काही जणांना वेगवेगळ्या प्रकारचे साहसी स्टंट करण्याची सवय असते; पण ते स्टंट ते तज्ज्ञांकडून शिकून प्रॅक्टिस करून करत असतात. तरीही चूक होण्याची शक्यता असते आणि ती चूक जीवावर बेतू शकते. त्यात आगीशी स्टंट करणं जीवघेणं ठरू शकतं. बरेच जण अशा स्टंटमुळे जीव गमावून बसतात. त्यामुळे असे स्टंट करताना योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक असतं. खबरदारी घेतली नाही, तर काय होऊ शकतं, याचा प्रत्यय दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) सध्या व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 'टीव्ही 9 हिंदी'ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

    या व्हायरल व्हिडिओत एक माणूस तोंडात पेट्रोल (Petrol) भरून त्यातून आगीच्या भयंकर ज्वाळा काढण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही ज्या स्टंटबद्दल बोलतोय, तो कदाचित तुम्ही सर्कसमध्ये पाहिला असेल. तोच स्टंट या व्हिडिओतला माणूस करतोय. तो रस्त्यावर उभा दिसतोय आणि त्याच्या अवतीभवती बरेच जण त्याला पाहत उभे आहेत. तो तोंडात पेट्रोल भरून हातात आग लागलेली काठी घेऊन आगीच्या ज्वाळा काढायला जातो. तो त्या जळणाऱ्या काठीवर तोंडातून पेट्रोल फुंकतो; पण त्याचा अंदाज चुकतो आणि काही तरी वेगळंच होऊन बसतं.

    आगीशी (Fire) खेळ करणं या माणसाच्या जीवावर बेतलं. कारण जसा तो आगीवर फुंकर मारतो, तशीच त्याच्या तोंडाला आग लागते. त्याचा नेम चुकतो आणि आगीच्या ज्वाळा निघण्याऐवजी त्याच्या चेहऱ्यावरच आग लागते. आगीमुळे घाबरलेला हा माणूस आग विझवण्याचा प्रयत्न करतो. अशातच प्रेक्षकांमध्ये उभा असलेला एक जण समोर येतो आणि चेहऱ्यावरची आग विझवण्यास या व्यक्तीला मदत करतो. दोघांच्याही प्रयत्नांना यश येतं आणि त्याच्या चेहऱ्यावरची आग विझते; पण या स्टंटमध्ये त्याचा चेहरा पोळतो.

    Video : पाण्यालाच लागली आग! हँडपंपमधून पाण्यासह उठले आगीचे लोळ

    दरम्यान, हा धक्कादायक व्हिडिओ ट्विटरवर ‘द डार्विन अवॉर्ड्स’ (The Darwin Awards) नावाच्या युझरने शेअर केला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या अवघ्या 15 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाख 36 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शेकडो जणांनी हा व्हिडिओ लाइक केलाय आणि शेअर केलाय. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी असे स्टंट जीवावर बेतू शकतात असं म्हटलंय, तर काही जण स्टंट करताना या माणसाची झालेली फजिती पाहून हसत आहेत.

    First published:

    Tags: Fire, Live video viral, Social media