जाहिरात
मराठी बातम्या / Viral / वेगवान बाईकची कारला टक्कर, त्यानंतर जे घडलं ते थक्कं करणारं; घटनेचा Video Viral

वेगवान बाईकची कारला टक्कर, त्यानंतर जे घडलं ते थक्कं करणारं; घटनेचा Video Viral

वेगवान बाईकची कारला टक्कर, त्यानंतर जे घडलं ते थक्कं करणारं; घटनेचा Video Viral

वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या बाईकला अपघात, गाडीचे तुकडे तुकडे झालेल्या ‘या’ अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 28 ऑगस्ट 2022 : सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे आपल्यासमोर अशा गोष्टी येतात, ज्याची आपल्याला अपेक्षा देखील नसते. रस्ते अपघाता संदर्भात देखील आपल्यासमोर असे व्हिडीओ येतात जे आपल्या हृदयाचे ठोके चुकवतात. यामध्ये बऱ्याचदा चालकाची चूकी असते तर कधी-कधी इतरांच्या चुकीमुळे हे अपघात घडतात. परंतु काहीही असलं तरी असे अनेक अपघाताचे व्हिडीओ आपल्यासमोर एक उदाहरण म्हणून आले आहेत. ज्यामुळे आपल्याला तशी चूक न करण्यासाठी चेतावनी मिळते. सध्या सोशल मीडियावर शेअर होत असलेला व्हिडीओ देखील असाच काहीसा आहे. यामुळे रस्त्यावरुन गाडी चालवताना काय सावधगिरी बाळगावी लागते हे तुम्हाला लक्षात येईल. लोक रस्त्यावर भरधाव वेगाने गाडी चालवताना तुम्हाला दिसले असतील, परंतू याच गोष्टीमुळे ते बऱ्याचदा अपघाताला बळी पडले आहेत. हे वाचा : धावत्या कारसोबत थरार! चाकातून अचानक येऊ लागल्या आगीच्या ठिणग्या आणि… पाहा VIDEO या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण भरधाव वेगाने बाईक चालवत येतो, तेव्हा तो एका कारच्या बाजूने आणि एका ट्रकच्यामधून जागा काठत जाणार असतो. परंतू तेव्हा वेगामुळे त्याचं नियंत्रण चुकतं आणि तो कारला धडकतो आणि खाली पडतो. हा अपघात इतका गंभीर आहे की, तुमच्या अंगावर काटा उभा राहिल.

जाहिरात

कारण या तरुणाची बाईक बाजूच्या ट्रक्यच्या चाकाखाली गेली आहे. नशीबाने हा तरुण बचावला. तरुण ज्या पद्धतीने उठून उभा राहिला त्यावरुन तरी असं दिसत आहे की, त्याला गंभीर दुखापत झाली नाही. परंतु या तरुणाचा जीव थोडक्यात बचावला. नाहीतर त्याच्या गाडीची जी अवस्था झाली ती पाहून तरी लक्षात आलंच असेल की, त्याचं काय झालं असतं. हे वाचा : …अन् डोळ्यादेखत 23 सेकंदात गायब 4 धावत्या गाड्या; रस्त्यावर असं घडलं तरी काय पाहा VIDEO हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर Vicious Videos नावाच्या आयडीने शेअर करण्यात आला आहे. 31 सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत 15 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडीओला लाईकही केलं असून विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात