नवी दिल्ली 21 डिसेंबर : कधीकधी आपण स्वतः आपल्यासोबत घडणाऱ्या घटनांची कल्पना नसते. मात्र ज्या लोकांसमोर या घटना घडत असतात त्यांना आधीच याची कल्पना येते आणि ते लगेचच मदतीसाठी धावून येतात. याचाच प्रत्यय देणाऱ्या एका घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल (Shocking CCTV Footage Viral) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. व्हिडिओमध्ये दिसतं की पोर्श कारमध्ये (Porsche Car Viral Video) बसलेली महिला आपल्या कारमध्ये डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आली, पण कोणीतरी तिचा जीव घेण्यासाठी मागे येत आहे हे तिला माहिती नव्हतं.
Tesla कार पुन्हा एकदा चर्चेत! ऑटोपायलट मोड असल्याने महिलेवरील 'तो' प्रसंग टळला
अचानक एक व्यक्ती पेट्रोल पंपावर आला आणि गाडीच्या पेट्रोल टाकीतील पाईप काढून त्याने याठिकाणी आग लावली (Man Sets Car on Fire). व्हिडिओमध्ये दिसतं की गाडीत इंधन भरण्यासाठी महिला पेट्रोल पंपावर गेली. कारमध्ये आरामात बसलेल्या या महिलेनं कर्मचाऱ्याला इंधन भरण्यास सांगितलं. पंपाच्या कर्मचाऱ्याने कारच्या टँकमध्ये पाईप ठेवला आणि तो काही अंतरावर जाऊन थांबला. इतक्यात एक व्यक्ती अचानक मागून आला आणि त्याने टँकमधील पाईप बाहेर काढला. यानंतर त्याने आपल्याकडील लाईटरने इंधनाचा पाईप आणि कारच्या टँकमध्ये आग लावली. यानंतर एका सेकंदातच आगीचा भडका उडाला.
Terrifying moment man sets #Porsche on #fire as woman sits inside it at #petrol station in #China
The man who started the fire was detained by police and the incident is being investigated.#Chinese #Viral pic.twitter.com/tj14x44K9L — Chaudhary Parvez (@ChaudharyParvez) December 18, 2021
ही घटना घडली तेव्हा कारमध्ये बसलेल्या महिलेला काहीच कल्पनाही नव्हती. कारला आग लागल्याचे पाहून पंपावरील कर्मचारी आग विझवण्यासाठी तिथे आले. एका व्यक्तीने सर्वात आधी महिलेला कारमधून बाहेर काढलं आणि तिथून दूर जाण्यास सांगितलं. पंपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवत आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि मग फायर एक्सटिंगुशरच्या (Fire Extinguisher) मदतीने आग विझवली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.
लग्नानंतर 6 महिन्यात महिला झाली आई, सासूने घराबाहेर काढलं,अखेर आला भलताच ट्विस्ट
ट्विटरवर हा व्हिडिओ @ChaudharyParvez नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, चीनमध्ये पेट्रोल पंपावर एका व्यक्तीने महिला बसलेल्या कारला आग लावली. आग लावणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fire, Shocking video viral