मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नानंतर 6 महिन्यातच महिलेनं दिला बाळाला जन्म, सासूने घराबाहेर काढलं, पण अखेर प्रकरणात भलताच ट्विस्ट

लग्नानंतर 6 महिन्यातच महिलेनं दिला बाळाला जन्म, सासूने घराबाहेर काढलं, पण अखेर प्रकरणात भलताच ट्विस्ट

एका महिलेनं लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यातच बाळाला जन्म दिला (Woman Gave Birth to Child After 6 Months of Marriage). सहा महिन्यातच बाळाला जन्म दिल्याने तिच्या सासरी एकच गोंधळ उडाला

एका महिलेनं लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यातच बाळाला जन्म दिला (Woman Gave Birth to Child After 6 Months of Marriage). सहा महिन्यातच बाळाला जन्म दिल्याने तिच्या सासरी एकच गोंधळ उडाला

एका महिलेनं लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यातच बाळाला जन्म दिला (Woman Gave Birth to Child After 6 Months of Marriage). सहा महिन्यातच बाळाला जन्म दिल्याने तिच्या सासरी एकच गोंधळ उडाला

  • Published by:  Kiran Pharate

ग्वाल्हेर 21 डिसेंबर : एक अतिशय अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात एका महिलेनं लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यातच बाळाला जन्म दिला (Woman Gave Birth to Child After 6 Months of Marriage). सहा महिन्यातच बाळाला जन्म दिल्याने तिच्या सासरी एकच गोंधळ उडाला. आजूबाजूच्या लोकांनी चर्चा सुरू करताच सासरकडच्यांनी हे बाळ आपल्या मुलाचं नसल्याचं सांगत महिलेला घराबाहेर काढलं. ही घटना एका वर्षापूर्वीची आहे. या प्रकरणी कौटुंबीक न्यायालयाने सासू-सासऱ्यांची ऑनलाईन काउन्सलिंग करून हे कुटुंब तुटण्यापासून वाचवलं. ही घटना ग्वाल्हेरच्या अशोकनगर येथील आहे.

ग्वाल्हेरमधील कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक हरीश दिवाण यांनी सांगितलं की, अशोक नगर येथील एका 25 वर्षीय महिलेने सोशल मीडियावर मध्यस्थी सेलचा नंबर पाहिल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला होता. तिनं सांगितलं की, 30 मे 2020 रोजी तिचा गुना येथील एका तरुणासोबत प्रेमविवाह (Love Marriage) झाला होता. लग्नाच्या 6 महिन्यांनंतर 10 डिसेंबर रोजी तिने मुलाला जन्म दिला. ६ महिन्यांतच मूल झाल्याने सासरच्या घरात खळबळ उडाली. सासरे आणि शेजारी सगळे तिच्यावर घाणेरडे आरोप करू लागले. मात्र, पतीला सत्य माहीत असल्याचं तरुणी सांगत राहिली. काही दिवसांनी सासरच्या लोकांनी तिला घरातून बाहेर काढलं आणि माहेरी पाठवलं.

चिमुकलीच्या गळ्यावर चाकू ठेवत आईवर केला बलात्कार; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

हे बोलणं ऐकल्यानंतर समुपदेशन पथकाने गुना येथे राहणाऱ्या महिलेच्या पतीशी संपर्क साधला. पतीनेही मूल आपलं नसल्याचं सांगितलं. यानंतर टीमने सांगितलं की तरुणाने घरच्यांसमोरच प्रेमविवाह सहा महिन्यांपूर्वी केला होता, मात्र, त्यापूर्वी त्याने मंदिरात याच महिलेशी लग्न केलं होतं आणि पत्नी बनवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. टीमने पतीला सांगितलं की जर मुलाची डीएनए चाचणी त्याच्याशी जुळली तर पत्नीचा सांभाळ न केल्याबद्दल त्याला तुरुंगात जावं लागेल.

टीमचं बोलणं ऐकल्यानंतर या व्यक्तीने मान्य केलं की बाळ त्याचंच आहे. मात्र समाज आणि कुटुंबाच्या भीतीने आपण मान्य करत नव्हतो, असं तो म्हणाला. टीमने भरपूर समजवल्यानंतर अखेर हिंमत करून त्याने आपल्या घरच्यांना सत्य सांगितलं. अखेर सासूलाही आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तिने सुनेसोबत संवाद साधला. या ऑनलाईन बोलण्यात सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या. अखेर सासू सुनेच्या घरी गेली आणि आपल्या सुनेला तसंच नातवाला घेऊन आनंदात आपल्या घरी आली.

फेसबुक फ्रेंडचा नागपुरातील विवाहितेवर बलात्कार; गर्भवती राहताच बदललं मन अन्...

या महिलेची आपल्या पतीसोबत फेसबुकवर ओळख झाली होती. यानंतर दोघंही एकमेकांसोबत चॅट करू लागले. काही दिवसांतच त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. दोघंही भेटू लागले. 2020 साली मे महिन्यात त्यांनी सर्वांसमोर लग्न केलं. त्याआधीच त्यांनी मंदिरात लग्नगाठ बांधली होती. डिसेंबर 2020 मध्येच महिलेनं बाळाला जन्म दिला. मात्र कुटुंबीयांच्या गैरसमजामुळे महिलेला मानसिक त्रासाला सामोरे जावं लागलं.

First published:

Tags: Marriage, Small baby