न्यू यॉर्क, 21 डिसेंबर : अमेरिकेत (america) एका मुलीचा जन्म होताच ती जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. कारण या मुलीचा जन्म हा कारमध्ये झाला आहे. टेस्ला इलेक्ट्रिक कारच्या (Tesla Electric Car) पुढच्या सीटवर एका महिलेने तिच्या बाळाला जन्म (Childbirth in the Car) दिला. यावेळी कार ऑटोपायलट मोडवर होती. अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये (Philadelphia) ही घटना घडली आहे. या महिलेला हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी 20 मिनिटं लागणार होती. मात्र, तोपर्यंत महिलेने कारमध्येच बाळाला जन्म दिला.
टेस्ला कारमधून ही महिला प्रसूतीसाठी (Child Delivery) तिच्या पतीसोबत हॉस्पिटलच्या दिशेने जात होती. यावेळी वाटते ही घटना घडली. ट्रॅफिकमुळे या जोडप्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास अडचण येत होती. त्यामुळे त्यांनी त्यांची कार ऑटोपायलट मोडवर ठेवली आणि हॉस्पिटलला जाण्यापूर्वी गाडीतच महिलेची प्रसूती झाली.
ऑटोपायलट मोडवर चालली कार
घटना घडली तेव्हा या अमेरिकन जोडप्यासोबत गाडीमध्ये त्यांचा 3 वर्षांचा मुलगादेखील होता. कार ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर, पतीने कार ऑटोपायलट मोडवर ठेवली आणि मागच्या सीटवर असलेल्या तीन वर्षांच्या बाळावर लक्ष ठेवलं. तसंच पुढच्या सीटवर असलेल्या पत्नीची देखील काळजी घेतली. द फिलाडेल्फिया एन्क्वायररने असं वृत्त दिलं आहे. तिथून हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना 20 मिनिटं लागली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर गाडीतच बाळाची नाळ कापण्यात आली. हॉस्पिटलच्या परिचारिकांनी नवजात बाळाला 'द टेस्ला बेबी' असं नाव दिलं. या आगळ्यावेगळ्या घटनेने सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
आई व्हायचंय पण वारंवार गर्भपात होतोय? डॉक्टरांनी सांगितला उपाय
टेस्लासाठी चांगली बातमी
कार ऑटोपायलट मोडवर असताना त्यामध्ये बाळाचा जन्म झाला, ही टेस्ला कंपनीसाठी चांगली बातमी ठरली आहे. कारण टेस्ला कार यंदाच्या वर्षी सुरक्षेबाबत चर्चेत आली होती. या वर्षाच्या सुरुवातीला टेस्ला कारच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक अहवालानुसार तेव्हा ही कार ऑटोपायलट मोडवर होती. दोन वर्षांपूर्वी टेस्ला सेडानच्या अपघातात अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्यानंतर, त्याच्या कुटुंबियांनी इलेक्ट्रिक कार कंपनीवर दावा दाखल केला. तर नुकतीच एका व्यक्तीने आपली टेस्ला कार डायनामाइट लावून उडवून दिली. कारण त्याला कारच्या दुरुस्तीसाठी 17 लाख रुपये खर्च येत होता. इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्ला तिच्या नावीन्यपूर्ण आणि नवीन तंत्रज्ञानासाठी जगभरात ओळखली जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या कारच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यातच कारमध्ये झालेला बाळाचा जन्म हा कंपनीसाठी एक आनंदाची बातमी ठरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Elon musk, Tesla, Tesla electric car