नवी दिल्ली 22 फेब्रुवारी : देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. अनेकदा लोक मृत्यूच्या दारातून परत येतात किंवा अतिशय मोठ्या दुर्घटनेतून वाचतात, तेव्हा या म्हणीचा वापर केला जातो. सध्या याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. यात मृत्यू एका मुलाच्या अगदी जवळ आला मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला (Man Saves Toddler’s Life). सध्या या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल डिस्कशन फोरम रेडिटवर व्हायरल होत आहे. समुद्रात मस्ती करत होते लोक; इतक्यात अचानक पाण्यात कोसळलं हेलिकॉप्टर, LIVE VIDEO व्हिडिओमध्ये (Shocking Accident Video) दिसतं की एक मुलगा धावत रस्त्यावर पोहोचतो. समोरून एक ट्रक अतिशय वेगात या मुलाच्या दिशेने येते. मात्र सुदैवाने एका व्यक्तीची नजर या मुलावर पडते आणि तो अतिशय फिल्मी स्टाईलने ऐनवेळी मुलाला ट्रकखाली येण्यापासून वाचवतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळेच त्या व्यक्तीचं कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्याच्या कडेला एक महिला आपल्या मुलासोबत स्कूटीवर बसलेली आहे. तिथून काहीच अंतरावर एक लहान मुलगा उभा आहे. पुढच्याच क्षणी हा मुलगा रहदारीच्या रस्त्यावर पळू लागतो. यानंतर जे काही घडतं ते पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की हा मुलगा एका भरधाव ट्रकखाली येणार इतक्यात एक चमत्कार होतो. ऐनवेळी एक व्यक्ती तिथे येतो आणि अगदी फिल्मी अंदाजात या मुलाचा जीव वाचवतो. दुसरीकडे ट्रक चालकानेही लगेचच ब्रेक दाबून गाडी थांबवली होती.
VIDEO - रेल्वेचालकाने हद्दच केली; आपले चोचले पुरवण्यासाठी थांबवली ट्रेन आणि…
अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ रेडिटवर u/handlewithcareme नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यूजरने कॅप्शनमध्ये लिहिलं, या व्यक्तीच्या सतर्कतेमुळे एका मुलाचा जीव वाचला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेकडो यूजर्सनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रत्येकजण या व्यक्तीचं कौतुक करत आहे. तर काहींनी ट्रक चालकाचंही कौतुक केलं आहे. लोकांचं म्हणणं आहे की ज्या वेगात त्याने अचानक गाडी थांबवली ते कौतुकास्पद आहे.