जाहिरात
मराठी बातम्या / Viral / समुद्रात मस्ती करत होते लोक; इतक्यात अचानक पाण्यात कोसळलं हेलिकॉप्टर, थरारक घटनेचा LIVE VIDEO

समुद्रात मस्ती करत होते लोक; इतक्यात अचानक पाण्यात कोसळलं हेलिकॉप्टर, थरारक घटनेचा LIVE VIDEO

समुद्रात मस्ती करत होते लोक; इतक्यात अचानक पाण्यात कोसळलं हेलिकॉप्टर, थरारक घटनेचा LIVE VIDEO

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की शेकडो लोक बीचवर बसलेले आहेत तर काही लोक समुद्रात पोहत आहेत. इतक्यात एक हेलिकॉप्टर पाण्यात कोसळताना दिसतं

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 22 फेब्रुवारी : आपली लहान चूक अनेकदा मोठ्या दुर्घटनेचं रूप घेऊ शकते. अमेरिकेतील एका प्रसिद्ध बीचवर नुकतंच एक अशीच दुर्घटना घडली. तुम्ही कधी बीचवर गेला असाल किंवा टीव्हीमध्ये पाहिलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की समुद्रकिनारी बीचवर लोक वेळ घालवण्यासाठी जातात. तिथे भरपूर मस्ती करतात. समुद्राची मजा घेतात. असंच काहीसं अमेरिकेतील या बीचवरही सुरी होतं, मात्र इतक्यात अचानक तिथे एक हेलिकॉप्टर क्रॅश झालं (Helicopter Crash on Beach). VIDEO - रेल्वेचालकाने हद्दच केली; आपले चोचले पुरवण्यासाठी थांबवली ट्रेन आणि… सध्या एक हेलिकॉप्टर पाण्यात कोसळल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Helicopter Crash in Sea Video) होत आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, मियामीच्या साउथ बीचवर 19 फेब्रुवारीला ही मोठी दुर्घटना घडली. बीचच्या जवळच समुद्रात एक हेलिकॉप्टर क्रॅश झालं. या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही आणि जीवितहानीही झाली नाही. मात्र, 2 लोक जखमी झाले आहेत.

जाहिरात

मिळालेल्या माहितीनुसार, मियामी बीच पोलिसांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की शेकडो लोक बीचवर बसलेले आहेत तर काही लोक समुद्रात पोहत आहेत. इतक्यात एक हेलिकॉप्टर पाण्यात कोसळताना दिसतं. हे हेलिकॉप्टर अगदी वेगात पाण्याकडे येताना दिसतं. अचानक हेलिकॉप्टर पाण्याती कोसळतं. आसपासच काही लोक उपस्थित असल्याचे दिसतात. Video:‘स्वच्छ भारत मिशनची खरी शिपाई’; घराच्या सफाईसाठी महिलेने लावली जीवाची बाजी हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर इमर्जंसी क्रू लगेचच घटनास्थळी नाव घेऊन पोहोचला. सांगितलं जात आहे, की 3 मधील 2 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. अद्याप हे समजू शकलेलं नाही, की हेलिकॉप्टर क्रॅश झालं कसं आणि हे कर्मिशयल की पब्लिक एअरक्राफ्ट होतं. व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी सांगितलं की ही घटना त्यांनी लाईव्ह पाहिली आहे आणि हा अनुभव अतिशय भीतीदायक होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात