जयपूर, 21 फेब्रुवारी : सिग्नल असेल किंवा आपात्कालीन परिस्थिती आली तरच ट्रेन तात्काळ थांबवली जाते. नाहीतर शक्यतो भरधाव ट्रेन मध्येच अचानक थांबवली जात नाही. यामुळे अपघाताचाही धोका असतो. असं असताना एका ट्रेनचालकाने मात्र मूर्खपणाचा कळस गाठला. फक्त आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी त्याने ट्रेन थांबवली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही घटना राजस्थानच्या अलवरमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. ट्रेनच्या लोको पायलटला (Loco Pilot) कचोरी खाण्याची इच्छा झाली. त्यासाठी त्याने स्टेशनच्या आधीच ट्रेन थांबली (Driver stop train for kachori). व्हिडीओत पाहू शकता रेल्वे फाटकाजवळ रेल्वे ट्रॅकवर एक व्यक्ती हातात एक पिशवी घेऊन उभी आहे. रेल्वे फाटक बंद करण्यात आलं आहे. तिथं काही गाड्याही थांबवण्यात आल्या आहेत. इतक्यात एक ट्रेन येते आणि तिथं थांबते. हे वाचा - हैवान! पतीची क्रूरता पाहून कोर्टही संतप्त; नागपुरात महिलेला लगेच घटस्फोट मंजूर ट्रेन स्टेशन नसतानाही मध्येच थांबली आहे. त्यानंतर रेल्वे ट्रॅकवर आधीपासून उभी असलेली व्यक्ती ट्रेनमधील ड्रायव्हरच्या हातात आपल्या हातातील पिशवी देते. त्यानंतर ही ट्रेन सुरू होते.
माहितीनुसार या पिशवीत दुसरं तिसरं काही नाही तर कचोरी आहे. या ड्रायव्हरने चक्क कचोरी घेण्यासाठी ही ट्रेन थांबली होती आणि ट्रेनमधील प्रवासी आणि फाटकाजवळ उभे असलेले इतर वाहनचालक ट्रेन सुरू होण्याची प्रतीक्षा करत राहिले. हे वाचा - Video : ‘स्वच्छ भारत मिशनची खरी शिपाई’; घराच्या साफ-सफाईसाठी महिलेने लावली जीवाची बाजी मायावती फॅन नावाच्या युट्यूब चॅनेलवरही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतल्याचं सांगितलं जातं आहे. संबंधितांवर कारवाईही करण्यात आली आहे, असं वृत्त झी न्यूज हिंदी ने दिलं आहे.