जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मित्रासोबत भयंकर मस्करी; सोफ्यावर बसताच बॉम्ब फुटला अन् 2 फूट हवेत उडाला तरूण, VIDEO

मित्रासोबत भयंकर मस्करी; सोफ्यावर बसताच बॉम्ब फुटला अन् 2 फूट हवेत उडाला तरूण, VIDEO

मित्रासोबत भयंकर मस्करी; सोफ्यावर बसताच बॉम्ब फुटला अन् 2 फूट हवेत उडाला तरूण, VIDEO

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती आपल्या मित्रांना घरी बोलवून त्यांच्यासोबत प्रँक करतो. तो आपल्या मित्रांना सोफ्यावर बसण्यास सांगतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 10 नोव्हेंबर : मित्रांचं (Friends) आपल्या आयुष्यात एक वेगळंच स्थान असतं. आनंद, दुःख किंवा आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी मित्र मदत करतात. मात्र, अनेकदा मित्र अशी मस्करी करतात जे पाहून सगळेच हैराण होतात. अनेकदा लोक मस्करीच्या नादात असं काहीतरी करतात की समोरच्याच्या डोळ्यात अश्रू येतात. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल (Prank Video Viral) होत आहे. 22 मजली इमारतीच्या छतावर चढून चिमुकल्यांचा भयंकर स्टंट, थरकाप उडवणारा VIDEO अनेकदा आपण पाहिलं असेल की पार्टी देण्यावरुन मित्रांमध्ये बरेच वाद सुरू असतात. काही लोक तर पार्टीपासून (Party) वाचण्यासाठी असे बहाणे सांगतात किंवा असं काही करतात की पार्टी मागणारा व्यक्तीही लाजेल. मात्र, दुसऱ्या प्रकारचेही लोक असतात. जे पार्टी मागणाऱ्या मित्रांसोबत अशी मस्करी करतात की पाहून कोणीही घाबरेल. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती आपल्या मित्रांना घरी बोलवून त्यांच्यासोबत प्रँक करतो. तो आपल्या मित्रांना सोफ्यावर बसण्यास सांगतो. इतक्यात सोफ्याच्या खाली ठेवलेला बॉम्ब फुटतो. यामुळे सोफ्यावर बसलेला मित्र हवेत दोन फूट उंच उडतो आणि मग खाली कोसळतो. हे पाहून इतर मित्र हसू लागतात.

जाहिरात

हा विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावर (Funny Video on Social Media) लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, सगळ्यांचे मित्र असेच असतात. तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, मित्र कधीच सुधरणार नाहीत. आणखी एकानं कमेंट करत म्हटलं की देव असे मित्र कोणाला देवू नये. Ranu Mandal ची पुन्हा सोशल मीडियावर चर्चा, आता व्हायरल होतोय हा VIDEO हा मजेशीर व्हिडिओ @AwardsDarwin नावाच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. बातमी देईपर्यंत ८० हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर अनेकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात