नवी दिल्ली 10 नोव्हेंबर : तुम्ही हे वाक्य तर अनेकदा ऐकलं असेल की लहान मुलं देवाचं रूप असतात. ते मनानं आणि विचाराणंही अतिशय निस्वार्थी असतात. तुम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यात लहान मुलांचा निरागसपणा दिसतो. त्यांचा हा निरागसपणा सर्वांचंच मन जिंकतो. तर, अनेकदा त्यांची मस्तीही सर्वांचं मन जिंकते. मात्र जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो पाहून तुम्हाला राग येईल. व्हिडिओमध्ये (Stunt Video of Kids) दोन लहान मुलांनी असं काही केलं, जे पाहून कोणीही हैराण होईल.
Ranu Mandal ची पुन्हा सोशल मीडियावर चर्चा, आता व्हायरल होतोय हा VIDEO
व्हिडिओ पाहून लोकांना विश्वास बसत नाहीये की लहान मुलंही असं काही करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ चीनच्या हुबेई क्षेत्रातील Xianning येथील आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की कशाप्रकारे 22 मजल्याच्या इमारतीच्या छतावर दोन मुलं उड्या घेत आहेत (Stunt on Building). हैराण करणारी बाब म्हणजे हे दोघंही न घाबरता अगदी आरामात एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उडी घेत आहेत. मात्र दोन्ही मुलं सुरक्षित असून त्यांना काहीही दुखापत झालेली नाही. मात्र त्यांचा हा खेळ अतिशय धोकादायक आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ जवळच उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं शूट केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
खुर्चीवर बसल्या बसल्याच आला मृत्यू, समोरच्या व्यक्तीलाही आली नाही कल्पना
व्हिडिओमध्ये दोन्ही मुलं मस्ती करताना दिसत आहेत. मुलांचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे. सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले असून या गोष्टीसाठी त्यांनी मुलांच्या पालकांना जबाबदार धरलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Stunt video