मराठी बातम्या /बातम्या /Viral /Ranu Mandal ची पुन्हा सोशल मीडियावर चर्चा, आता व्हायरल होतोय हा VIDEO

Ranu Mandal ची पुन्हा सोशल मीडियावर चर्चा, आता व्हायरल होतोय हा VIDEO

आता त्यांच्या एका व्हिडीओने पुन्हा एकदा इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. राणू मंडलचं छठ पूजेचं गाणं व्हायरल होत आहे. दरम्यान या व्हिडीओवर टीका देखील केली जात आहे

आता त्यांच्या एका व्हिडीओने पुन्हा एकदा इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. राणू मंडलचं छठ पूजेचं गाणं व्हायरल होत आहे. दरम्यान या व्हिडीओवर टीका देखील केली जात आहे

आता त्यांच्या एका व्हिडीओने पुन्हा एकदा इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. राणू मंडलचं छठ पूजेचं गाणं व्हायरल होत आहे. दरम्यान या व्हिडीओवर टीका देखील केली जात आहे

  मुंबई, 9 नोव्हेंबर: सोशल मीडियामध्ये (Social Media) प्रचंड ताकद आहे. सोशल मीडियामुळे एखादी व्यक्ती एका रात्रीत लोकप्रिय होऊ शकते किंवा लोकप्रियतेच्या शिखरावरून जमिनीवर येऊ शकते. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे राणू मंडल (Ranu Mandal). राणू मंडल यांना त्यांच्या गायन कौशल्यामुळे बॉलिवूड संगीत दिग्दर्शक आणि हिमेश रेशमियानं (Himesh Reshammiya and Ranu Mandal Song) त्यांना सोबत गाण्याची संधी दिली. रेल्वे स्टेशनवर गाणं मागून भीक मागणाऱ्या राणू यांना त्यानंतर प्रचंड प्रसिद्धी मिळाली. मात्र, ते म्हणतात ना, 'दैव देतं आणि कर्म नेतं' अशी राणूची गत झाली होती. राणू यांना लोकप्रियता सांभाळता आली नाही. परिणामी त्यांच्यावर पुन्हा रेल्वे स्टेशनवर गाणं म्हणण्याची वेळ आली. पण तरीही त्या कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतात. त्यांचे काही व्हिडीओ आणि फोटो देखील व्हायरल होत असतात.

  आता त्यांच्या एका व्हिडीओने पुन्हा एकदा इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. राणू मंडलचं छठ पूजेचं गाणं व्हायरल होत आहे. सध्या संपूर्ण बिहार आणि बंगालच्या काही भागामध्ये छठ पूजेचा (Chhath Pooja) सण साजरा होत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात छठचे गीत मोठ्या प्रमाणात ऐकले जात आहेत. अशातच राणू मंडलचा आवाज असल्याचं सांगून एक गाणं व्हायरल झालं आहे. मात्र, प्रत्यक्षात व्हायरल झालेलं छठचं गाणं राणू मंडलच्या आवाजातील नाही, असं लोकांचं म्हणणं आहे. या प्रकारामुळं लोक संतप्त झाले आहेत. व्हिडीओच्या कव्हर फोटोवर राणू मंडलचं नाव का वापरलं गेलं? असा प्रश्न लोक सोशल मीडियावर विचारत आहेत.

  " isDesktop="true" id="628550" >

  राणू मंडलच्या नावानं प्रमोशन होत असलेलं हे गाणं यूट्यूबवर चांगलंच व्हायरल होत आहे. आतापर्यंत 9 लाखांहून अधिक लोकांनी हे गाणं पाहिलं आहे. हा आवाज राणू मंडलचा नसल्याचं सोशल मीडियावरील अनेक युजर्स म्हणत आहेत. एका युजरनं म्हटलं आहे की, "फक्त लाईक्स आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी कोणाचंही नाव लिहिणं आणि फोटो वापरणं योग्य नाही." छठच्या गाण्यासोबत राणू मंडलचा आणखी एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या चिकन करी बनवताना दिसत आहेत. सोबतच ‘जब कोई बात बिगड़ जाए’ हे गाणंही गात आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

  " isDesktop="true" id="628550" >

  पश्चिम बंगालमधील राणा घाट रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा' गाणं गात असताना एका व्यक्तीनं राणू मंडल यांचा एक व्हिडीओ तयार केला होता. नंतर त्या व्यक्तीनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ रातोरात व्हायरल झाला आणि राणू मंडलला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. म्युझिक डिरेक्टर हिमेश रेशमिया यांनी तर राणू यांना प्लेबॅक सिंगिंगची संधीदेखील दिली होती.

  First published:
  top videos

   Tags: Social media viral, Video viral