जाहिरात
मराठी बातम्या / Viral / युवकानं एक्स गर्लफ्रेंडला दिलं अनोखं गिफ्ट; पाहताच ढसाढसा रडू लागली तरुणी, नेटकरी म्हणाले...

युवकानं एक्स गर्लफ्रेंडला दिलं अनोखं गिफ्ट; पाहताच ढसाढसा रडू लागली तरुणी, नेटकरी म्हणाले...

युवकानं एक्स गर्लफ्रेंडला दिलं अनोखं गिफ्ट; पाहताच ढसाढसा रडू लागली तरुणी, नेटकरी म्हणाले...

टीकटॉक स्टार (Tiktok Star) शॉननं आपली एक्स गर्लफ्रेंड कॅट किनन हिच्या ३१ व्या वाढदिवशी तिला अनोखं गिफ्ट दिलं

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 17 ऑक्टोबर : प्रेम (Love) हे एक अशी गोष्य आहे, ज्यात दोन लोक एकमेकांसोबत जोडले जातात. त्यांचा आनंद आणि दुःख दोन्ही एक होऊन जातात. हे दोघंही एकमेकांमध्ये इतके गुंततात की आयुष्य एकमेकांशिवाय जगूच शकत नाही असं त्यांना वाटू लागतं. मात्र, अनेकदा गोष्टी बदलतात. लग्नास अनेक अडचणी येतात. नातेवाईक मध्ये येतात आणि हे नातं तुटून ब्रेकअप होतो (Worst Breakup Ever). बहुतेक नात्यांमध्ये ब्रेकअपनंतर (Relation After Breakup) कटूता पाहायला मिळते. मात्र, आज आम्ही ज्या एक्स कपलबाबत बोलत आहोत, त्यांची स्टोरी लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. या महिलेच्या सौंदर्यावर भलेभले फिदा; चेहरा पाहून नाही येणार वयाचा अंदाज वेल्समध्ये राहणारा शॉन टिकटॉकवर भरपूर प्रसिद्ध आहे. श़ॉनचा काही दिवसांआधीच आपल्या लॉन्ग टर्म गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाला. यानंतर जेव्हा एक्स गर्लफ्रेंडचा बर्थडे आला तेव्हा शॉन तिला भेटायला गेला. यावेळी त्यानं आपल्या एक्स गर्लफ्रेंडला जे गिफ्ट (Gift for Ex-Girlfriend) दिलं, ते व्हायरल झालं आहे. शॉननं एक्स गर्लफ्रेंडसोबतच्या भेटीचा व्हिडिओ टीकटॉकवर शेअर केला. जो लाखो लोकांनी पाहिला. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट केल्या की शॉन आजही आपल्या प्रेयसीच्या प्रेमात बुडालेला आहे. टीकटॉक स्टार (Tiktok Star) शॉननं आपली एक्स गर्लफ्रेंड कॅट किनन हिच्या ३१ व्या वाढदिवशी तिला अनोखं गिफ्ट दिलं. कॅट आपल्या कर्जाच्या ओझ्याखाली होती. अशात शॉननं बँकेत कॉल करत कॅटचं सर्व कर्ज फेडलं. या कपलला टीकटॉकवर भरपूर पसंती मिळत असे. दोघांनी नोव्हेंबर 2020 पासून जॉब गेल्यानं व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली होती. मात्र, काही काळातच त्यांचं ब्रेकअप झालं, ब्रेकअपनंतरही दोघं चांगले मित्र होते. अजबच! …अन् वेडिंग ड्रेस घालून लग्न मंडपात पोहोचली नवरीची आई; उडाला एकच गोंधळ नुकतंच कॅटच्या ३१ व्या वाढदिवशी शॉनने तिची भेट घेण्यासाठी जात तिचं लोन फेडून तिला आश्चर्याचा धक्का दिला. हा व्हिडिओ टीकटॉकवर आतापर्यंत ३० लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. कॅटकडे घराची चावी फेकत त्यानं म्हटलं की त्याच्याकडे तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट आहे. यानंतर त्यानं कॅटला तिचं संपूर्ण कर्ज फेडल्याचं सांगितलं. हे ऐकताच कॅटला आश्चर्याचा धक्का बसला. ती अतिशय आनंदी झाली आणि शॉनला पकडून रडू लागली. हा व्हिडिओ लोकांच्या पसंतील उतरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात