मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Pretty Woman! या महिलेच्या सौंदर्यावर भलेभले फिदा; चेहरा पाहून नाही येणार वयाचा अंदाज

Pretty Woman! या महिलेच्या सौंदर्यावर भलेभले फिदा; चेहरा पाहून नाही येणार वयाचा अंदाज

लिजानं सांगितलं, की जेव्हा कमी वयाची मुलं माझ्यासोबत फ्लर्ट करतात तेव्हा मला हसू येतं, कारण मला असं वाटतं की मी त्यांच्या आईच्या वयाची आहे.

लिजानं सांगितलं, की जेव्हा कमी वयाची मुलं माझ्यासोबत फ्लर्ट करतात तेव्हा मला हसू येतं, कारण मला असं वाटतं की मी त्यांच्या आईच्या वयाची आहे.

लिजानं सांगितलं, की जेव्हा कमी वयाची मुलं माझ्यासोबत फ्लर्ट करतात तेव्हा मला हसू येतं, कारण मला असं वाटतं की मी त्यांच्या आईच्या वयाची आहे.

    नवी दिल्ली 17 ऑक्टोबर : तुम्ही आजपर्यंत असे अनेक लोक पाहिले असतील, ज्यांचं वय त्यांच्या चेहऱ्यावरुन समजत नाही. नुकतंच इंग्लंडमधील (England) एका महिलेनं आपलं एक लाईफ सिक्रेट (Life Secret) शेअर केलं आहे. महिलेनं सांगितलं, की लोकांना तिचं वय अतिशय कमी वाटतं (Old Lady Looks Younger). अनेकदा तर तिच्यापेक्षा कमी वयाचे पुरुषही तिच्यासोबत फ्लर्ट (Flirt with Older Woman) करतात. या महिलेचं सौंदर्य पाहून लहानांपासून प्रौढांपर्यंत सगळेच थक्क होतात. अजबच! ...अन् वेडिंग ड्रेस घालून लग्न मंडपात पोहोचली नवरीची आई; उडाला एकच गोंधळ इंग्लंडच्या अॅसेक्समध्ये राहणारी लिजा लॉरे 52 वर्षांची आहे. मात्र, लोक तिला ३० वर्षाची समजतात. नुकतंच मिरर वेबसाईटसोबत बातचीत करताना लिजानं आपल्या आयुष्यातील अनेक अनुभव शेअर केले. लिजानं म्हटलं, की मला या गोष्टीमुळे अनेकदा अभिमान वाटतो, तर काही वेळा लाजही वाटते की लोकांना माझ्या खऱ्या वयाचा अंदाज येत नाही. तिनं म्हटलं की जेव्हा मी लहान होते, तेव्हा मला लोकांकडून इतक्या कॉम्पलिमेंट मिळत नव्हत्या, जितक्या आता मिळतात. लिजानं सांगितलं, की तिनं कधीही अँटी रिंकल इंजेक्शनचा वापर केलेला नाही. लिजानं सांगितलं, की जेव्हा कमी वयाची मुलं माझ्यासोबत फ्लर्ट करतात तेव्हा मला हसू येतं, कारण मला असं वाटतं की मी त्यांच्या आईच्या वयाची आहे. मात्र, मी त्यांच्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करते. लोक जेव्हा माझं कौतुक करतात, तेव्हा मी फक्त थँक्यू बोलते, असंही तिनं म्हटलं. लिजानं सांगितलं, की ती महागड्या सामानाचा वापर करत नाही. मेकअप काढण्यासाठी ती ऑलिव ऑईलचा वापर करते, जे फक्त 500 रुपयांत मिळतं. तरुणीच्या डान्स VIDEOचा सोशल मीडियावर धिंगाणा; रेल्वे स्टेशनवरच लगावले ठुमके लिजानं सांगितलं, की बऱ्याच महागड्या वस्तूंची तिला अॅलर्जी आहे, त्यामुळे ती स्वस्तातील सामान वापरते. 2016 मध्ये तिनं एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता. यानंतर तिचा आत्मविश्वास भरपूर वाढला. आता ती मॉडेलिंग करते आणि अनेक स्पर्धांमध्ये भागही घेते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Beauty queen, Viral news

    पुढील बातम्या