मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अजबच! ...अन् वेडिंग ड्रेस घालून लग्न मंडपात पोहोचली नवरीची आई; उडाला एकच गोंधळ

अजबच! ...अन् वेडिंग ड्रेस घालून लग्न मंडपात पोहोचली नवरीची आई; उडाला एकच गोंधळ

नवरीच्या आईचा ड्रेस इतका सुंदर होता, की सर्वच लोक तिचं कौतुक करू लागले. मात्र, नंतर सर्वांना समजलं की ही नवरी नसून तिची आई आहे.

नवरीच्या आईचा ड्रेस इतका सुंदर होता, की सर्वच लोक तिचं कौतुक करू लागले. मात्र, नंतर सर्वांना समजलं की ही नवरी नसून तिची आई आहे.

नवरीच्या आईचा ड्रेस इतका सुंदर होता, की सर्वच लोक तिचं कौतुक करू लागले. मात्र, नंतर सर्वांना समजलं की ही नवरी नसून तिची आई आहे.

    नवी दिल्ली 17 ऑक्टोबर : लग्नात बऱ्याचदा अरेंजमेंटबाबत (Wedding Arrangement) गडबड होते. मात्र, लग्नात लोकांनी नवरीबाईलाच ओळखलं नाही तर? एका लग्नात एक अशीच घटना (Wedding Incident) घडली. या लग्नात पाहुणे इतका वेळ जिला नवरीबाई समजत राहिले, ती खरं तर नवरी नव्हतीच, तर नवरीप्रमाणेच ड्रेस घातलेली तिची आई होती. नवरीबाईच्या आईचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Bride Photo Viral on Social Media) होताच अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. तरुणीच्या डान्स VIDEOचा सोशल मीडियावर धिंगाणा; रेल्वे स्टेशनवरच लगावले ठुमके ब्रिटनमध्ये झालेल्या या लग्नात नवरीची आई नवरीप्रमाणेच व्हाईट लेसच्या सुंदर ड्रेसमध्ये नवरीप्रमाणेच तयार होऊन पोहोचली. द सनच्या वृत्तानुसार, नवरीच्या आईचा ड्रेस इतका सुंदर होता, की सर्वच लोक तिचं कौतुक करू लागले. मात्र, नंतर सर्वांना समजलं की ही नवरी नसून तिची आई आहे. नवरीच्या आईनं असा ड्रेस घातला होता, जो कोणत्याही नवरीसाठी तिचा ड्रीम वेडिंग ड्रेस (Dream Wedding Dress) असू शकतो. हा गाउन अतिशय लांब होता, जसा नवरीचा वेडिंग ड्रेस (Bride Wedding Dress) असतो. लग्नात गेलेल्या एका पाहुण्यानं जेव्हा नवरीच्या आईचा फोटो रेडिटवर शेअर केला तेव्हा यूजर्सही शॉक झाले. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, मी नवरीला ओळखत नव्हतो, त्यामुळे पहिल्यांदा पाहिल्यावर मला असं वाटलं की ही महिलाच नवरी आहे, कारण तिनं वेडिंग ड्रेस घातला होता. नंतर सत्य समोर आल्यावर मला नवरीसाठी खूप वाईट वाटलं, कारण तिच्यासाठी हा खूप खास दिवस होता. बापरे! प्रायव्हेट पार्टच शरीरावेगळा केला; शार्कचा भयंकर हल्ला, तरुणाचा मृत्यू हे फोटो पाहून यूजर्सनं यावर भरपूर कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, हा खरंच वेडिंग ड्रेस आहे. दुसऱ्या यूजरनं लिहिलं, हे तर अगदी माझ्या वेडिंग ड्रेसप्रमाणे आहे. आणखी एका यूजरनं लिहिलं, महिलेचा हाच ड्रेस दुसऱ्या कलरचा असता तर बरं झालं असतं. आणखी एकानं लिहिलं, बहुतेक ही महिला आपला ड्रेस घेण्यासाठी वेडिंग ड्रेस स्टोरमध्ये गेली होती.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bride, Wedding couple

    पुढील बातम्या