नवी दिल्ली 09 मे : आजकाल जिममध्ये जाणं हा लोकांच्या रोजच्या सवयीचा भाग बनला आहे. पूर्वीपेक्षा आता लोक आपल्या फिटनेसची जास्त काळजी घेतात आणि जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. अनेकजण तर जिममध्ये न जाताच घरीच न चुकता दररोज व्यायाम करतात. मात्र, घरच्या घरी जिमसारखा व्यायाम करताना खूप काळजी घ्यावी लागते. अन्यथा त्याचे वाईट परिणामही होऊ शकतात. VIDEO: रस्त्याने जाताना पादचाऱ्याच्या डोक्यात विनाकारण मारलं; दुसऱ्याच क्षणी दुचाकीस्वाराला मिळालं ‘कर्माचं फळ’ सध्या हीच शिकवण देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यात एक व्यक्ती प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसून हातात रॉड घेऊन चेस्ट एक्सरसाईज करताना दिसतो. मात्र काहीच वेळात त्याच्यासोबत जे काही घडलं ते पाहून तुम्ही शॉकही व्हाल आणि तुम्हाला हसूही येईल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Funny Exercise Video) तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती जिम रॉडमध्ये वजनाची प्लेट लावून छातीचा बेंच प्रेस व्यायाम करत आहे. मात्र, यासाठी तो बँचचा वापर करत नसून खुर्चीचा वापर करत आहे. प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून बेंच प्रेस व्यायाम करण्याचा विचारच किती चुकीचा आहे, याची तुम्ही कल्पना करू शकता. मात्र या व्यक्तीने याबाबत विचारही केला नाही आणि काहीच सेकंदात त्याला याचा परिणाम दिसला.. हा व्यक्ती रॅप्स मारू लागताच मागून खुर्ची तुटते आणि हा व्यक्ती धाडकन खाली कोसळतो. ‘2 घावात 2 तुकडे’; दोन्ही हात नसतानाही कुऱ्हाडीने तोडलं लाकूड; कसं शक्य झालं पाहा, VIDEO व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आलं असेल. मात्र, अशाप्रकारचे व्यायाम घरी आणि कोणत्याही लॉजिकशिवाय करणं अतिशय महागातही पडू शकतं. सोशल मीडियावर अनेकजण हा व्हिडिओ पाहत आहेत. शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. तर अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.