नवी दिल्ली 09 मे : रस्त्याने चालताना नेहमी सावध आणि सतर्क राहावं, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. तुम्ही पायी चालत असाल किंवा कारनेही जात असाल तरी रस्त्यावर सावधगिरी हाच बचावाचा एकमेव मार्ग आहे. आजकाल अपघातांच्या बातम्याही रोज ऐकायला मिळतात आणि बहुतांश अपघात हे भरधाव वाहनांमुळे होतात. काही लोक स्वत:ला वेगाचा ‘राजा’ मानून अगदी वेगात वाहने घेऊन रस्त्यावर फिरताना दिसतात. बचावासाठी गेलेल्या पथकावरच बिबट्याचा प्राणघातक हल्ला; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO कधी हे लोक गाडी चालवताना स्टंट (Stunt on Road) करायला लागतात तर कधी भरधाव वेगाने इतर वाहनांना ओव्हरटेक करताना दिसतात. काही वेळा दुचाकीस्वार पादचाऱ्यांना त्रास देत असल्याचंही दिसून येतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दुचाकीवर बसलेली दोन मुलं वाटेत एका व्यक्तीला मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करतात, मात्र दुसऱ्या क्षणी त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळतं.
व्हिडिओमध्ये (Funny Video Viral) तुम्ही बघू शकता की, दोन दुचाकीस्वार रस्त्यावरून जात आहेत. पुढे एक व्यक्ती वाटेने पायी चाललेला आहे. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या मुलांनी पादचाऱ्याला त्रास देण्याच्या उद्देशाने पाठीमागून त्याच्या डोक्यात मारलं. मात्र त्यानंतर या नादात बाईक चालवणाऱ्या मुलाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि पादचाऱ्यासोबत तोही दुचाकीवरून खाली पडला. एका व्यक्तीला विनाकारण त्रास देणं या दोघांना चांगलंच महागात पडलं आणि त्यांना कर्माचं फळ मिळालं. यामुळेच अनेकदा असं म्हटलं जातं की कोणालाही विनाकारण त्रास देऊ नये. मात्र, काही लोकांना इतरांना त्रास देण्याची सवयच असते. अशात याचं फळ तर त्यांना मिळायलाच पाहिजे. व्यक्तीच्या तळहातावर उभा राहून चिमुकलीने मारली जबरदस्त बॅकफ्लिप; VIDEO पाहून घालाल तोंडात बोटं हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर jatt_brand_mehkma या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अवघ्या दोन सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 5 लाख 91 हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी व्हिडिओ लाइकही केला आहे. त्याचबरोबर लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिलं, ‘मी तर हा विचार करतोय की खाली पडल्यानंतर दुचाकीस्वारांचं काय झालं असेल’. अनेकांनी असंही म्हटलं की दुचाकीस्वारांना त्यांच्या कर्माचं फळ लगेच मिळालं.