जाहिरात
मराठी बातम्या / Viral / '2 घावात 2 तुकडे'; दोन्ही हात नसतानाही कुऱ्हाडीने तोडलं लाकूड; कसं शक्य झालं पाहा, VIDEO

'2 घावात 2 तुकडे'; दोन्ही हात नसतानाही कुऱ्हाडीने तोडलं लाकूड; कसं शक्य झालं पाहा, VIDEO

'2 घावात 2 तुकडे'; दोन्ही हात नसतानाही कुऱ्हाडीने तोडलं लाकूड; कसं शक्य झालं पाहा, VIDEO

ट्विटर यूजर जॉन पॉम्प्लियानोने अलीकडेच आपल्या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यातील व्यक्तीची जिद्द आणि मेहनत पाहण्यासारखी आहे. व्हिडिओमधील व्यक्तीला दोन्ही हात नाहीत, तरीही तो कुऱ्हाडीने लाकूड कापताना दिसतो

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 08 मे : या जगात विजय त्या व्यक्तीचा होतो, ज्याच्यामध्ये कमतरता असूनही काहीतरी करण्याची हिंमत असते. जर एखाद्या व्यक्तीला आपल्यातील कमतरतांची भीती वाटत असेल तर तो कधीच काहीही करू शकत नाही. याचंच उदाहरण देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये (Man with no hands cutting wood video) दिसणारा व्यक्ती ही बाब सिद्ध करत आहे की, अपंगत्व असूनही धैर्य दाखवलं तर विजय मिळतोच. छातीवर चढून श्वानाने मालकाला नदीच्या पाण्यात ढकललं; कॅमेऱ्यात कैद झाली घटना, पाहा VIDEO ट्विटर यूजर जॉन पॉम्प्लियानोने अलीकडेच आपल्या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यातील व्यक्तीची जिद्द आणि मेहनत पाहण्यासारखी आहे. व्हिडिओमधील व्यक्तीला दोन्ही हात नाहीत, तरीही तो कुऱ्हाडीने लाकूड कापताना दिसत आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो त्याच्या कामात इतका परफेक्ट दिसतो की त्याला हात नसतानाही तो सगळी लाकडं अगदी एकसारखी कापतो.

जाहिरात

व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती बर्फाळ भागात उभा आहे. त्याच्या शेजारी लाकडाचे मोठे तुकडे ठेवले आहेत आणि मध्यभागी पुरलेल्या एका तुकड्यावर तो लाकडाचे तुकडे कापत आहे. हात नसल्यामुळे त्याने तोंडाखाली मानेजवळ कुऱ्हाडी पकडली असून आपल्या शरीराच्या वजनाच्या मदतीने तो कुऱ्हाड चालवताना दिसत आहे. अवघे दोन वार करताच तो लाकूड दोन तुकड्यात तोडतोही. VIDEO - श्वानांसमोर शक्तिशाली बिबट्याचीही तंतरली; शिकार सोडून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड या व्हिडिओला 10 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि या व्यक्तीचं कौशल्य पाहून नेटकरी अवाक झाले आहेत. अभिनेता आर माधवनही या व्यक्तीच्या कौशल्याने प्रभावित झाला आहे. व्हिडिओ रिट्विट करताना त्याने हार्ट आणि हात जोडणारा इमोजी पोस्ट केला आहे. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका महिलेने लिहिलं की ‘देव तुम्हाला शक्ती आणि आशीर्वाद देवो’. आणखी एका व्यक्तीने लिहिलं की, व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीबद्दल त्याच्या मनात आदर निर्माण झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात