मराठी बातम्या /बातम्या /Viral /OMG! हेडलाइटमधून आगीच्या ज्वाळा सोडते ही कार; थक्क करणारा Flame throwing car video

OMG! हेडलाइटमधून आगीच्या ज्वाळा सोडते ही कार; थक्क करणारा Flame throwing car video

या कारमधून निघणाऱ्या आगीच्या ज्वाळा (Flame throwing car) जवळपास 20 फुटापर्यंत जातात.

या कारमधून निघणाऱ्या आगीच्या ज्वाळा (Flame throwing car) जवळपास 20 फुटापर्यंत जातात.

या कारमधून निघणाऱ्या आगीच्या ज्वाळा (Flame throwing car) जवळपास 20 फुटापर्यंत जातात.

मॉस्को, 09 ऑगस्ट : रस्त्यावर जास्तीत स्पीडने धावणारी कारही (Car) तुम्हाला माहिती असेल. आगीच्या विळख्यात सापडलेल्या बर्निंग कारचा (Burning car) थरार तुम्ही पाहिला असेल. पण एखाद्या कारलाच (Car video) अशी आग ओकताना (Flame throwing car) कधी पाहिलं आहे का? कदाचित अशी कार पाहिली असेल पण ती एखाद्या फिल्ममध्ये. हॉलिवूड फिल्ममध्ये अशा हटके कार दाखवल्या जातात. पण फिल्ममध्ये दिसणारी अशीच कार आता प्रत्यक्षातही साकारली आहे.

सोशल मीडियावर (Social media) आग ओकणाऱ्या एका कारचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. ही कार पाहून प्रत्येक जण थक्क झाला आहे. ही कार सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

व्हिडीओत पाहू शकता एक कार उभी आहे. अचानक तिच्यातून आग बाहेर पडताना दिसते. कारच्या हेडलाइटमधून ही आग निघते आहे.

हे वाचा - बसणंही अशक्य एवढ्याशा कारमध्ये ड्रायव्हिंग; पठ्ठ्याने कशी केली कमाल पाहा VIDEO

माहितीनुसार रशियातील एका कार मॅकेनिकने ही कार तयार केली आहे. त्याने आपल्याजवळ असलेली एक कार मॉडिफाय केली. रशियातील Vahan Mikaelyan नावाच्या व्यक्तीजवळ  VAZ-2106 Zhiguli  कार होती. त्याने या कारमध्ये काही बदल केले आहे. ज्यामुळे या कारमधून आग बाहेर पडते.  ही कार आता ड्रॅगन म्हणून ओळखली जाते.

या कारच्या हेडलाइटवर फ्लेमथ्रोवर नोझल्स (Flamethrower nozzles) लावण्यात आले आहेत. ज्यामधून कारमधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत आहेत. या कारमधील आगीच्या ज्वाळा जवळपास 20 फुटापर्यंत जातात.  हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण थक्क आहे.

हे वाचा - VIDEO: लाकडी पट्ट्यावरुन बोटीवर बाईक चढवण्याचा प्रयत्न, पुढे असं काही झालं की...

रेडिटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. अनेकांनी ही कार कोणत्या चमत्कारिक वस्तूपेक्षा कमी नाही. तर काहींनी मात्र अशा कारचा उपयोग करणं धोकादायक ठरू शकतं, अशी चिंताही व्यक्त केली आहे.

First published:

Tags: Burning car, Car, Fire, Russia, Shocking viral video, Viral, Viral videos