नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (Social Media Viral Video) होत असतात. काही व्हिडीओ खळखळून हसवणारे, तर काही व्हिडीओ काहीतरी धडा देणारेही असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून एक बाईक बोटीवर चढवण्यासाठी काही लोकांनी केलेला प्रयत्न कशाप्रकारे फसला त्याचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये काही लोक एका अरुंद लाकडाच्या पट्ट्यावरुन बाईक नेताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये एक नदी आणि नदीवर पूल असल्याचं दिसतंय. तसंच दुसरीकडे एक बोटही उभी असल्याचं दिसतंय. काही लोक बोट आणि पुलाच्यामध्ये एक लाकडाचा अरुंद पट्टा टाकून त्यावरुन बाईक नेण्याचा प्रयत्न करत आहेत. लाकडाच्या अरुंद पट्ट्याचं एक टोक बोटीवर आहे, तर दुसरं टोक एका पूलाच्या कडेला ठेवलेलं दिसत आहे. इतकी वजनदार बाईक दोघेजण मिळून पातळ असणाऱ्या लाकडाच्या पट्ट्यांवरुन नेताना दिसतात. एका व्यक्तीने बाईकला मागून पकडलं, आणि दुसऱ्याने पुढच्या बाजूने हँडल पकडलं आहे. बोटीजवळ उभी असलेली व्यक्ती बाईकच्या हँडलला पकडून बाईक हळूहळू पुढे घेण्याचा प्रयत्न करते. यावेळी दुसऱ्या व्यक्तीने बाईक सोडलेली होती.
VIDEO:‘900 रुपयांत काही मिळो न मिळो,आयुष्य नक्कीच मिळतं’,तरुणीची कारला धडक आणि..
बाईक अगदी बोटीच्या टोकाशी घेऊन जाण्यापर्यंत ते यशस्वी होतात. पण पुढे जाऊन बाईक थेट पाण्यात पडते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला असून अनेक नेटकऱ्यांनी त्यांचा या प्रयत्नावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ renné nésa नावाच्या ट्विटर युजरने शेअर केला आहे.
video favorit netizen pic.twitter.com/gRyMh14VSY
— renné nésa (@makmummasjid) July 19, 2021
अनेकांनी आता व्हिडीओ पाहून हसू येत असलं तरी त्या व्यक्तीची तिथे काय परिस्थिती झाली असेल अशी कमेंट केली आहे. तर एका नेटकऱ्याने हा व्हिडीओ धडा शिकवणारा असून मूर्खपणा करणं टाळा आणि आपलं नुकसान होण्यापासून बचाव करा, असं म्हटलं आहे.