मुंबई, 09 ऑगस्ट : ही कार (Car) पाहिली तर खेळण्यातील (Toy car) रिमोट कंट्रोलवर (Remote control car) चालणारी कारच वाटते. यामध्ये तर एखादं लहान मुलंही (Small car) नीट बसू शकत नाही. पण एका तरुणाने मात्र या कारमध्ये बसून ती चालवून दाखवली आहे (Man driving small car). आश्चर्य वाटलं ना? (Shocking video) ज्या कारमध्ये (Car video) बसताही येणं शक्य नाही. त्यामध्ये जाऊन ती चालवणं कसं काय शक्य आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? या पठ्ठ्याने जुगाड करून अशक्यही शक्य करून दाखवलं. या व्यक्तीने जो कारनामा केला आहे, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) झाला आहे. जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. आता त्याने हे केलं तरी कसं ते व्हिडीओत पाहा.
Nice little motor pic.twitter.com/7JOrZjkZg7
— Best Videos 🎥🔞 (@_BestVideos) August 5, 2021
व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर ही छोटीशी ऑरेंज कार चालताना दिसते आहे. पाहताच क्षणी वाटेल की कुणीतरी लहान मुलं रिमोटवर ही गाडी चालवतं आहे. हे वाचा - VIDEO: लाकडी पट्ट्यावरुन बोटीवर बाईक चढवण्याचा प्रयत्न, पुढे असं काही झालं की… पण गाडी थांबते. त्यानंतर पुढे जे पाहायला मिळतं ते पाहून धक्काच बसतो. या कारमधून चक्क एक व्यक्ती बाहेर पडते. ही व्यक्ती या कारच्या आत होती, जी कारमध्ये आडवी होती. त्यामुळे ड्रायव्हिंग सीटवर ती दिसत नव्हती. पण ही व्यक्ती स्वतः ही गाडी चालवत होती. ही कार इतकी लहान आहे की त्यात बसायलाही जागा नाही. अशा कारमध्ये जाऊन कुणी कसं काय ड्राइव्ह करू शकतं, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हे वाचा - मैदानातून धावत येत बैलाने प्रेक्षकांवरच घेतली उडी; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO बेस्ट व्हिडीओज ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहे. या व्यक्तीच्या कौशल्याला सर्वांनी दाद दिली आहे.