मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: 50 प्रवाशांना घेऊन निघालेल्या चालकाचा धावत्या बसमध्ये अचानक मृत्यू; पुढे घडली हादरवणारी दुर्घटना

VIDEO: 50 प्रवाशांना घेऊन निघालेल्या चालकाचा धावत्या बसमध्ये अचानक मृत्यू; पुढे घडली हादरवणारी दुर्घटना

जबलपूरमध्ये 50 प्रवाशांना घेऊन चाललेल्या मेट्रो बसच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा धटका आहे. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

जबलपूरमध्ये 50 प्रवाशांना घेऊन चाललेल्या मेट्रो बसच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा धटका आहे. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

जबलपूरमध्ये 50 प्रवाशांना घेऊन चाललेल्या मेट्रो बसच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा धटका आहे. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Madhya Pradesh, India

भोपाळ 03 डिसेंबर : रस्ते अपघाताची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मध्य प्रदेशात घडली. जबलपूरमध्ये 50 प्रवाशांना घेऊन चाललेल्या मेट्रो बसच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा धटका आहे. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. चालकाच्या मृत्यूनंतर बस अनियंत्रित झाली आणि या बसने सहा जणांना चिरडलं. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. बसने ट्राफिक सिग्नलवर उभा असलेल्या लोकांना चिरडलं आहे.

पोलिसांनी भाजीविक्रेत्याचा तराजू रेल्वे रुळावर फेकला, तरुण उचलायला गेला असताच ट्रेन आली अन्.., थरकाप उडवणारी घटना

जबलपूरच्या दमोह नाका परिसरात मेट्रो बस अनियंत्रित झाल्याने खळबळ उडाली. वाटेत माणसे आणि वाहनांना धडक देत मेट्रो बस रस्त्याच्या कडेला थांबली. सुरुवातीला लोकांना वाटलं की मेट्रो बस ड्रायव्हर मद्यधुंद आहे, पण जेव्हा लोकांना मेट्रो बस ड्रायव्हर बेशुद्धावस्थेत आढळला तेव्हा सगळेच हैराण झाले. बस चालकाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

" isDesktop="true" id="794589" >

बस चालवताना मेट्रो बस चालकाला हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा बसवरील ताबा सुटला. या अपघातात मेट्रो बसने ई-रिक्षा, ऑटो रिक्षा आणि दुचाकी चालकांनाही धडक दिली. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेट्रो बस चालकाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

मुजोर रिक्षाचालकांपासून कधी सुटका होणार? पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नाशिककर त्रस्त

सध्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कारण साधारणपणे थंडीच्या मोसमात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. मेट्रो बस चालकाला सकाळी अशाप्रकारे हृदयविकाराचा झटका येणे ही खरोखरच लोकांसाठी आश्चर्याची बाब आहे. हा अपघात यापेक्षाही भयानक होऊ शकत होता, मात्र सुदैवाने बस रस्त्याच्या कडेला थांबली.

First published:

Tags: Major accident, Shocking viral video