मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुजोर रिक्षाचालकांपासून कधी सुटका होणार? पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नाशिककर त्रस्त

मुजोर रिक्षाचालकांपासून कधी सुटका होणार? पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नाशिककर त्रस्त

नाशिक शहरामध्ये बेशिस्तपणे वागणाऱ्या रिक्षा चालकांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.

नाशिक शहरामध्ये बेशिस्तपणे वागणाऱ्या रिक्षा चालकांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.

नाशिक शहरामध्ये बेशिस्तपणे वागणाऱ्या रिक्षा चालकांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Nashik [Nasik], India

नाशिक, 03 डिसेंबर : वाहतूक कोंडीत मुंबईचे नाव पुढे आहे. मात्र, आता नाशिक शहर देखील वाहतूक कोंडीने ग्रासले आहे. सकाळी आणि सायंकाळी शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीला कारणीभूत रिक्षा चालक आहेत. बिनधास्तपने भर बाजारात रस्त्यांवर रिक्षा पार्क करून फिरत असतात. नियम पाळत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी अशा बेशिस्तपणे वागणाऱ्या रिक्षा चालकांमुळे होत आहे, असं नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षा चालकावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक नाशिक वाहतूक विभागाकडे करत आहेत.

नाशिक शहरात रिक्षा स्टँड बनविण्यात आले आहेत. मात्र, बेशिस्त रिक्षा चालक नियमांचे उल्लंघन करून वाहतूक कोंडी करतात. यामुळे इतर वाहनांना, पायी चालणाऱ्या नागरिकांना ही याचा त्रास होतो. शालिमार,मेनरोड, सिबीएस,अशोक स्तंभ,द्वारका,सातपूर,पंचवटी या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.

Pune : भुयारी मार्ग बनला धोकादायक, दारूचे अड्डे आणि अंधाराचं सर्वत्र साम्राज्य

वाहतूक कोंडी मध्ये रिक्षांचा सहभाग आहे. कारण कोणतेही नियम ते पाळत नाही. बऱ्याच वेळा बाजारात रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे इतर वाहनांना,नागरिकांना त्याचा फटका बसतो. या संदर्भात अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी करून देखील काही होत नाही. त्यामुळे नाशिक वाहतूक विभागाने  या संदर्भात दखल घेणे गरजेचे आहे. नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यास भाग पाडायला हवं. नियम न पाळणाऱ्या रिक्षा चालकावर कारवाई वाहतूक विभागाने करावी अशी मागणी नागरिक हेमंत काळमेख यांनी केली आहे.

बेशिस्त रिक्षा चालकांवर होणार कारवाई

या संदर्भात वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून वाहतूक विभाग रिक्षांच्या कागदपत्रांची पडताळणी करत आहे. त्यामध्ये अनेक रिक्षा या अवैध दिसून आल्या आहेत. बरेच रिक्षा चालक हे गुन्हेगार असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, मूळ मालकाने यासंदर्भात पडताळून बघण्याची गरज आहे. आपण रिक्षा ज्या व्यक्तीला चालवायला देतो. त्याची सखोल माहिती घेणे गरजेचे आहे. तो जर गुन्हेगार असेल तर रिक्षा चालवायला देऊ नये, त्याच्या कागदपत्रांचे पडताळणी करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील रिक्षा चालकांनी शहरात रिक्षा चालवू नये,ड्रेस कोड घालावा आणि रिक्षा स्टँडवरच आपली रिक्षा पार्क करावी अन्यथा बेशिस्तपणा जर दिसून आला तर कारवाई करण्यात येईल.

Kolhapur : कचऱ्याचा प्रश्न पेटला! प्रशासन का नागरिक पाहा कोण आहे कारणीभूत?,video

नागरिकांनी घ्यावी काळजी

आपण ज्या रिक्षा मधून प्रवास करणार आहोत. त्या विषयी काही अंशी का होईना आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. आपल्या जवळ असणाऱ्या दागिन्यांची सुरक्षा लक्षात घ्यावी. रिक्षा चालकांचे जर गैरवर्तन दिसून आले तर तात्काळ त्यांची माहिती वाहतूक विभागाला द्यावी,  असं आवाहन देखील पौर्णिमा चौघुले यांनी केले आहे.

First published:

Tags: Local18, Nashik