झांबिया, 06 फेब्रुवारी : तुम्ही बर्याच प्राण्यांना वाघाशी पंगा घेताना किंवा झुंज करताना पाहिले असेल. वाघाने प्राण्यांवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडीओ ही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र कधी सरड्याने वाघाशी पंगा घेतल्याचे पाहिले आहे? नाही ना. मात्र असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बिबट्याने एका जंगली पालीवर हल्ला केला. 2018 चा हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला असून आयएफएस अधिकारी परवीन कसवान यांनी हा व्हिडीओ ट्विट केला असून त्यानंतर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ फुटेज झांबियामधील कंगियू सफारीतला आहे. यात हल्ला करण्यासाठी आलेल्या बिबट्याला या सरड्याने आपल्या शेपटीने पळवून लावण्याचा प्रयत्न केला. वाचा- किशोर कुमार यांच्या सिनेमावर कोर्टानं घातली होती बंदी, 60 वर्षांनी सापडली रिल्स
वाचा- बॉलिवूडचे हिरो कोहलीसमोर झिरो! शाहरूख, अक्षयपेक्षा विराट सर्वात मोठा ‘ब्रॅण्ड’ डेली मेलच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ कोस्टा फ्रांझाईड्सने शूट केला आहे. ताज्या साइट्सशी बोलताना कोस्टा फ्रांझाईड्स म्हणाले की जेव्हा ही भीषण लढाई पाहिली तेव्हा ते इतर पर्यटकांसमवेत सफारीवर होते. या व्हिडीओमध्ये बिबट्या या मॉनिटर सरड्यावर चाल करून जाताना दिसत आहे. मात्र सरड्याच्या जेव्हा लक्षात आले की त्याचा जीव धोक्यात आला तेव्हा सरड्याने बिबट्यावर शेपटीने हल्ला केला. बराच काळ चाललेल्या या युद्धात रानटी सरड्याचा पराभव झाला. वाचा- टायगर श्रॉफ पुन्हा एकदा अॅक्शन अवतारात, पाहा धमाकेदार Baaghi 3 Trailer
वाचा- ‘शापित’ पांढऱ्या कोब्राचं गोंदियात दर्शन, दुर्मिळ सापाला पाहून घाबरगुंडी मुख्य म्हणजे मॉनिटर सरहा (monitor lizard) हा सरडा पाण्यात खूप वेगाने फिरतो. त्यामुळं पाण्याच्या ठिकाणी हा सरडा सुरक्षित असतो. दरम्यान बिबट्याने त्याच्यावर ज्या ठिकाणी हल्ला करण्यात आला तेथे आजूबाजूला पाणी नव्हते. हे मॉनिटर सरडा पाण्यात खूप वेगाने फिरते आणि सुरक्षित वाटते. जेव्हा बिबट्या क्यूबने त्याच्यावर हल्ला केला तेव्हा त्याच्या भोवती पाणी नव्हते.

)







