जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / टायगर श्रॉफ पुन्हा एकदा अ‍ॅक्शन अवतारात, पाहा धमाकेदार Baaghi 3 Trailer

टायगर श्रॉफ पुन्हा एकदा अ‍ॅक्शन अवतारात, पाहा धमाकेदार Baaghi 3 Trailer

टायगर श्रॉफ पुन्हा एकदा अ‍ॅक्शन अवतारात, पाहा धमाकेदार Baaghi 3 Trailer

‘बागी 3’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ज्यात टायगर श्रॉफ पुन्हा एका जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात दिसला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 फेब्रुवारी : अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या अ‍ॅक्शन सिनेमांसाठी ओळखला जातो. त्याच्या बागी फ्रांचायजीतील 3 सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ज्यात टायगर श्रॉफ पुन्हा एका जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात दिसला. ‘बागी 3’मध्ये टायगर श्रॉफसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर पुन्हा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याआधी श्रद्धा आणि टायगर बागी सिनेमात एकत्र दिसले होते. याशिवाय या सिनेमात रितेश देशमुख टायगरचा भाऊ विक्रम आणि पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. विक्रम त्याच्या कामासाठी सिरीयामध्ये जातो आणि अचानक एक दिवस त्याचं अपहरण होतं. आपल्या भावाला वाचवण्यासाठी टायगर सिरीयात जातो आणि तिथे पाहायला मिळातो त्याचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार…

टायगर श्रॉफचा बागी फ्रेंचायजीचा हा तिसरा जबरदस्त अ‍ॅक्शन सिनेमा असणार आहे. या सिनेमासाठी मागच्या काही दिवसांपासून जोरदार तयारी करत आहे. नुकतंच या सिनेमाचं शूट सुरू झालं आहे. बागीमध्ये टायगर श्रद्धा कपूरसोबत रोमान्स करताना दिसला होता. तर बागी 2 मध्ये तो दिशा पाटनीसोबत दिसला होता. त्यानंतर आता बागी 3 मध्ये पुन्हा एकदा श्रद्धा कपूर दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यात टायगरला पोलीस अटक करताना दिसले होते. ‘बागी 3’चं दिग्दर्शन अहमद खाननं केलं आहे. तर निर्मिती साजिद नाडियालवालाची आहे. या सिनेमात आशुतोष राणा, चंकी पांडे आणि अंकिता लोखंडे यांच्याही भूमिका असल्याचं बोललं जात आहे. पहिल्या दोन भागांप्रमाणे या तिसऱ्या भागातही जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स असणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात