गोंदिया, 04 फेब्रुवारी : गोंदियातील चांगोटोलातल्या नागरिकांची मंगळवारी दुपारी अक्षरश पाचावर धारण बसली. कारण गावकऱ्यांनी पहिल्यांदाच पांढरा कोबरा पाहिला. जगातल्या अत्यंत दुर्मिळ अशा प्रजातींपैकी एक असलेला पांढरा कोब्रा ज्याला अल्बिनो कोबरा असं म्हटलं जातं. या अत्यंत विषारी सापाला पाहून गावकऱ्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. त्यानंतर गावकऱ्यांनी वन विभागाला या सापाची माहिती दिली. तोपर्यंत सहा फूट लांबींच्या अजब सापाची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. सापाला पाहाण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली. तोपर्यंत वनपरिक्षेत्र अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सापाला पकडलं तेव्हा भीतीनं गाळण उडालेल्या गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. वन विभागानं सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडून दिलं. त्याला पांढऱ्या रंगाचा ‘शाप’ पांढरा कोब्रा जगातला अत्यंत दुर्मिळ साप आहे. तो सहसा कुठे दिसत नाही. या सापाचा रंग पूर्णपणे पांढरा असतो. रंगामुळे या सापाला चीनमध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं. पण जेनेटिक डिसऑर्डर अर्थात जनुकीय दोषामुळे सापाचा रंग पांढरा शुभ्र असतो. त्याचं पांढरं शुभ्र सौदर्यच त्याच्या जीवावर उठलंय. पांढरा रंग त्याच्यासाठी जणू शाप ठरतोय. या रंगामुळेच सापाची ही प्रजाती जगातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या सापाला इसे अल्बीनो कोबरा (Albino Cobra) असं म्हटलं जातं. खरंतर जेव्हा हा साप अंड्यातून बाहेर येतो, तेव्हा तो अनेक रंगांमध्ये असतो. पण नंतर जसजसं त्याचं वय वाढतं. त्याचा रंग उडून जातो. वयस्कर झाल्यानंतर तर तो पांढरा शुभ्र दिसू लागतो. पूर्ण वाढ झालेल्या सापाची लांबी 8 फूट इतकी असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








