किशोर कुमार यांच्या सिनेमावर कोर्टानं घातली होती बंदी, 60 वर्षांनंतर सापडली रिल्स

किशोर कुमार यांच्या सिनेमावर कोर्टानं घातली होती बंदी, 60 वर्षांनंतर सापडली रिल्स

60 वर्षांपूर्वी या सिनेमाच्या सर्व प्रिंट नष्ट करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले होते.

  • Share this:

मुंबई, 06 फेब्रुवारी : नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडियाला 1957 मध्ये कोर्टानं बंदी घातलेल्या किशोर कुमार यांच्या सिनेमाची प्रिंट सापडली आहे. 60 वर्षांपूर्वी या सिनेमाच्या सर्व प्रिंट नष्ट करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले होते. त्यामुळे एवढ्या वर्षांनंतर सिनेमाची प्रिंट मिळाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही प्रिंट आहे 1957 मध्ये रिलीज झालेल्या किशोर कुमार आणि शकिला ‘बेगुनाह’ या सिनेमाची. ज्यावर कोर्टानं बंदी घातली होती.

मागच्या आठवड्यात मिळालेल्या या सिनेमाच्या एका क्लिपमध्ये एकीकडे अभिनेत्री शकिला डान्स करताना दिसत आहे तर दुसरीकडे म्यूझिक कंपोझर जयकिशन पियानो वाजवताना दिसत आहेत. या सिनेमातील ‘ऐ प्यासा गिल बेजुबां’साठी मुकेश कुमार यांनी प्लेबॅक सिंगिग केलं होतं. पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार NFAI चे डायरेक्टर प्रकाश म्हणाले, अनेक लोक मागच्या अनेक वर्षांपासून या सिनेमाच्या रीलचा शोधात होते. ही रिल आमच्याकडे नव्हती. त्यामुळे आम्हीही त्याचा शोध घेतला. या सिनेमाची रिल 60 वर्षांनंतर मिळणं हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही.

टायगर श्रॉफ पुन्हा एकदा अ‍ॅक्शन अवतारात, पाहा धमाकेदार Baaghi 3 Trailer

कोर्टानं का दिला होता प्रिंट नष्ट करण्याचा आदेश

1957 मध्ये रिलीज झालेल्या किशोर कुमार यांच्या बेगुनाह सिनेमा विरोधात एक अमेरिकन कंपनी पॅरामाऊंट पिक्चर्सनं खटला दाखल केला होता. या कंपनीनं 1954 मध्ये तयार केलेल्या Nock On Wood ला कॉपी करुन हा सिनेमा तयार करण्यात आला आहे असा आरोप बेगुनाहच्या निर्मात्यांवर केला होता. मुंबई हायकोर्टानं या खटल्याचा निकाल पॅरामाऊंट कंपनीच्या बाजूनं दिला. यासोबतच कोर्टानं या सिनेमाच्या सर्व प्रिंट नष्ट करायला सांगत या सिनेमावर बंदी घातली.

VIDEO : ब्रेकअपबद्दल असं काय म्हणाला कार्तिक की, ऐकल्यावर सारालाही बसला धक्का

कोर्टानं या सिनेमावर बंदी घातली असली तरीही या सिनेमाचे असे काही चाहते होते ज्यांच्याकडे या सिनेमाच्या रिल्स होत्या. NFAI चे डायरेक्टर प्रकाश सांगतात, या सिनेमाचे चाहते आजही या सिनेमाच्या रिल्स शोधत आहे. कारण हा त्यावेळीचा तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा आहे. या सिनेमाच्या 16 MS च्या दोन रिल्स मिळाल्या आहेत. ज्या प्रत्येकी 60-70 मिनिटांच्या आहेत. यातील एक रिल दोन महिन्यांपूर्वी तर दुसरी रिल एका आठवड्यापूर्वी मिळाली आहे. अर्थात या दोन्ही रिल्स चांगल्या अवस्थेत नाहीत. मात्र त्यातील गाणी चालत आहेत.

सारा-कार्तिकनं रणवीर सिंहपासून लपवलं होतं 'हे' सत्य, आता झाला खुलासा

First published: February 6, 2020, 1:47 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या