Home /News /viral /

सावधान! तुम्हीही काढता असा सेल्फी? मग कपलसोबत घडलेली ही भयंकर घटना पाहाच

सावधान! तुम्हीही काढता असा सेल्फी? मग कपलसोबत घडलेली ही भयंकर घटना पाहाच

अनेकदा मृत्यू कॅमेऱ्यात कैद (Death Captured In Camera) होतो. असंच काहीसं घडलं, स्कॉटलँडमध्ये (Scotland) फिरायला गेलेल्या सोफी पास आणि पती रिचर्डसोबत.

    नवी दिल्ली 15 ऑगस्ट : दुर्घटना कधीही आणि कोणासोबतही घडू शकते. कधी कोणासोबत काय घडेल याबाबत कोणीच सांगू शकत नाही. त्यातच जीव जाण्याची गोष्ट असेल तर मृत्यूबाबत तर कोणालाच आधी भनक लागत नाही. मात्र, अनेकदा मृत्यू कॅमेऱ्यात कैद (Death Captured In Camera) होतो. असंच काहीसं घडलं, स्कॉटलँडमध्ये (Scotland) फिरायला गेलेल्या सोफी पास आणि पती रिचर्डसोबत. दोघंही पावसाळ्यात स्कॉटलँडमध्ये फिरायला गेले होते. यादरम्यान अचानक त्यांच्या सेल्फीमध्ये असं काही कैद झालं, ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. सोफी आणि तिचा पती रिचर्ड हे विकेण्डला लोच्स ऑफ नॉर्थ स्कॉटलँड (Lochs Of North Scotland) येथे गेले होते. यादरम्यान तिथे पाऊस सुरू होता. दोघांनीही नदीच्या समोर सेल्फी घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, सेल्फी क्लिक करतानाच या दोघांनाही या गोष्टीची जाणीव झाली की काहीतरी होणार आहे. सेल्फीमध्ये दिसतं की सोफीचे केस इलेक्ट्रोमॅगनेटमुळे वरती होऊ लागले. हे पाहताच रिचर्डला धोका समजला. यानंतर कपलनं तिथून पळ काढला. VIDEO: लग्न होताच नवरीचे नखरे, नवरदेवाला हातही लावू देईना; नेमकी भानगड काय? सोफी आणि रिचर्डच्या या सेल्फीनं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. त्यावेळी स्कॉटलँडमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र, तरीही कपलनं त्याठिकाणी जाऊन सुट्टी इन्जॉय करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सेल्फी घेत असतानाच रिचर्डला दिसलं, की सोफीचे केस वरती उभा राहात आहेत. त्यानं लगेचच आपल्या पत्नीचा हात पकडला आणि तो आपल्या कारच्या दिशेनं धावू लागला. कपलनं ज्याठिकाणी सेल्फी घेतला होता, तिथे काहीच वेळात वीज कोसळली. Corona Vaccine घेण्यासाठी त्यानं हद्दच केली पार; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात या घटनेबाबत बोलताना सोफीनं सांगितलं, की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं ही ट्रीप इन्जॉय केली. पाणी शांत होतं आणि हवादेखील थंड होती. मात्र, त्यांनी विजेच्या बाबत विचारच केला नव्हता. पावसात अनेकदा लोक विजेकडे दुर्लक्ष करतात. या कपलनंदेखील हीच चूक केली. दोघंही आरामात सेल्फी घेत होते. मात्र, पावसात अशा पद्धतीनं फिरणं घातक ठरू शकतं. परंतु, सेल्फीमुळे या कपलला येणाऱ्या धोक्याची आधीच कल्पना आली आणि दोघांचाही जीव वाचला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Selfie photo, Viral news

    पुढील बातम्या