Home /News /viral /

Corona Vaccine घेण्यासाठी त्यानं हद्दच केली पार; VIDEO पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Corona Vaccine घेण्यासाठी त्यानं हद्दच केली पार; VIDEO पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात

सोशल मीडियावर सध्या लसीकरणाचा हा अजब व्हिडिओ (Weird Video Viral) चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ (Funny Video) पाहून तुम्हाला हसूही येईल आणि तुम्ही हैराणही व्हाल

  नवी दिल्ली 15 ऑगस्ट : देशभरात कोरोनाचा (Coronavirus in India) प्रसार रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. कोरोनापासून बचावासाठी लस (Corona Vaccine) घेणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र, कोरोनाची लस मिळणं तितकं सोपं नाही. लस मिळवण्यासाठी काही लोक पैसे देत आहेत तर काही विविध जुगाड करून लस मिळवत आहेत. अनेकजण तर तासंतास रांगेत उभा राहून लस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच सध्या एका अशा व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल (Vaccination Viral Video) होत आहे ज्यानं लस मिळवण्यासाठी केलेलं काम पाहून सगळेच हैराण झाले आहेत. VIDEO : वडिलांनी केलेली मस्ती मुलाला पडली महागात; आईनं लाथ घालत काढलं बाहेर सोशल मीडियावर सध्या लसीकरणाचा हा अजब व्हिडिओ (Weird Video Viral) चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ (Funny Video) पाहून तुम्हाला हसूही येईल आणि तुम्ही हैराणही व्हाल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती दोन भिंतींच्या मध्ये स्पाईडरमॅनप्रमाणे लटकत खिडकीपर्यंत पोहोचतो. आणखी एक विशेष बाब म्हणजे इथे पोहताच आरोग्य कर्मचारी खिडकीतून त्याला लसही देतो.
  6 फूटाच्या दरवाजावर चढला एक वर्षाचा मुलगा, फोटो पाहून बसणार नाही विश्वास भारतीय लोक जुगाडाच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत. अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये त्यांचं डोकं अतिशय चालतं. व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळतं, की लसीकरण केंद्रासमोर भलीमोठी रांग लागलेली आहे. याच कारणामुळे, या व्यक्तीनं अशाप्रकारे भिंतीवर लटकून जात लस घेण्याची रिस्क घेतली. त्याला रांगेत उभा राहायचं नव्हतं आणि कदाचित याच कारणामुळे त्यानं याबाबत आधीच आरोग्य कर्मचाऱ्यासोबत बोलून घेतलं होतं. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Corona vaccination, Funny video, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या