• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • VIDEO: लग्न होताच नवरीचे नखरे, नवरदेवाला हातही लावू देईना; नेमकी भानगड काय?

VIDEO: लग्न होताच नवरीचे नखरे, नवरदेवाला हातही लावू देईना; नेमकी भानगड काय?

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर (Instagram) सध्या एक वेडिंग व्हिडिओ (Wedding Video) चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की इतर कार्यक्रम पार पडल्यानंतर नवरी आणि नवरदेव जेवण करण्यासाठी बसलेले आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली 15 ऑगस्ट : बहुतेक पालक लग्नाच्या आधी मुलगा आणि मुलगी या दोघांचं मत जाणून घेतात. साखरपुड्याआधीच नवरी-नवरदेव आणि त्यांच्या घरचे अनेकदा एकमेकांची भेटही घेतात. जेणेकरून एकमेकांना व्यवस्थितरित्या समजून घेता येईल. मात्र, काही कुटुंब अशी आहेत, जिथे अजूनही मुलीचं म्हणणं ऐकून न घेताच लग्न लावलं जातं. सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत असलेल्या एका व्हिडिओमधील नवरीचं (Bride Video) वागणं पाहून तुम्हाला याच गोष्टीचा प्रयत्यय येईल. VIDEO : ...अन् लग्नाआधीच नवरी-नवरदेवानं घेतली समुद्रात उडी; कारण ऐकून बसेल धक्का सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर (Instagram) सध्या एक वेडिंग व्हिडिओ (Wedding Video) चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्नातील इतर कार्यक्रम पार पडल्यानंतर नवरी आणि नवरदेव जेवण करण्यासाठी बसलेले आहेत. लग्नानंतर बहुतेक ठिकाणी नवरी आणि नवरदेव आपल्या हातानं एकमेकांना जेवण खाऊ घालतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरदेव नवरीला जेवण खाऊ घालत असतानाच नवरी नखरे करू लागते.
    VIDEO : वडिलांनी केलेली मस्ती मुलाला पडली महागात; आईनं लाथ घालत काढलं बाहेर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरदेव चमचानं इडलीचा एक तुकडा तोडून नवरीला खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो. मात्र, नवरी काहीच न बोलता आपला चेहरा फिरवते. हा व्हिडिओ पाहून असं जाणवतं, की एकतर या मुलीचं जबरदस्ती लग्न केलं जात आहे किंवा मग ती कुठल्यातरी गोष्टीमुळे नाराज आहे. मात्र, नवरीनं असं करूनही नवरदेव हसताना दिसतो. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत 51 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. कमेंटमध्ये बहुतेकांनी असं म्हटलं आहे, की हे लग्न नवरीच्या विरोधात जाऊन झालेलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published: